रामायण मालिकेतील रावणाने घेतला अखेरचा श्वास | अरविंद त्रिवेदी यांचे निधन

 रामायण मालिकेतील रावणाने घेतला अखेरचा श्वास.

Arvind Trivedi death, shocking death of Arvind Trivedi
PC - TWITTER/SUNILLAHRI


मागील काही दिवसांपासून अरविंद त्रिवेदी यांची तब्येत खराब होती. रामायण मालिकेत ज्या पद्धतीने त्यांनी रावणाची भूमिका केली होती ती भूमिका जणूकाही अमर झाली. जेवढी प्रभावशाली आणि दमदार त्यांची मालिकेतील भूमिका होती एकदम त्याच पद्धतीने त्यांनी ती भूमिका गाजवली होती. आजपण जेव्हा रामायण मालिकेची चर्चा होती राम, लक्ष्मण, सीता यांची भूमिका जशी अमर झाली त्याच पद्धतीने अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका काही अशाच पद्धतीने केली होती. आजपण कोणी रावणाचे नाव काढतो तेव्हा लगेच अरविंद त्रिवेदी यांचेच रामायण मालिकेत पात्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी मुंबईत त्यांनी हृदयविकाराच्या झटक्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांचा कार्यकाळ १९३९ ते २०२१ एवढा राहिला.


अरविंद त्रिवेदी यांच्याविषयी - 

१९८६ आणि १९८८ मधे टीव्ही वर जेव्हा यांचा आवाज येत होते तेव्हा दर्शकांचे काळीज धडधड करायचे. भले मोठे शरीर आणि मोठा आवाज लोकांच्या कानात बसला होता. रावणाची भूमिका करून ते जगभरात लोकप्रिय झाले होते. ते मध्यप्रदेश मधील इंदोर शहरातून उदयास आले. त्यांचा मोठा भाऊ उपेंद्र त्रिवेदी हे ही मोठ्या पडद्यावरील कलाकार होते. त्यांना पाहूनच अरविंद त्रिवेदी यांच्यात ॲक्टिंग करण्याचे बळ आले. रावणाच्या भूमिकेतून त्यांना एवढी लोकप्रियता मिळाली की लोक त्यांना वास्तविक जीवनातही रावण म्हणूनच पाहत होते. रावणाच्या भूमिकेसाठी जवळ जवळ ३०० कलाकारांनी भाग घेतला होता. त्यात अरविंद त्रिवेदी यांनी निवड झाली. 


जेव्हा मालिकेत रावण मारला गेला तेव्हा त्याच्या परिसरात त्यांच्या चाहत्यांनी दुःख व्यक्त केले होते. एवढे ते लोकप्रिय झाले होते. 

त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच सदिच्छा!


हे वाचा.

World Cup Timetable

AIR INDIA TATA कडे कशी आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या