आयपीएल २०२१ च्या CSK vs KKR च्या अंतिम लढतीत काय काय घडले? Highlights CSK Beat KKR By २७ Runs. PC

 आयपीएल  २०२१ च्या CSK vs KKR च्या अंतिम लढतीत काय काय घडले?  Csk ने Kkr वर २७ धावांनी विजय मिळवला.

CSK vs KKR २०२१ IPL Finalआयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यामध्ये २ तुल्यबळ संघांची लढत आपल्याला पाहायला मिळाली.

तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्स ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आपल्या मागील सामन्यातील खेळणाऱ्या खेळाडूंवर विश्वास ठेवत संघात बदल केला नाही. चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी - 


चेन्नई सुपर किंग्जचे दोन धुरंदर फलंदाज मैदानात उतरले. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी आपल्या संघाला मजबूत स्थितीत उभे केले. चेन्नई ने पॉवर प्ले मध्ये एकही विकेट न गमावता  ५० धावा फलकावर लावल्या. 

 • ९ व्या ओवरमधे सुनील नारायण ने ऋतुराज गायकवाड ला २७ बॉल ३२ रनांमधे कॅच आऊट केले. मग रॉबिन उथप्पा मैदानावर फलंदाजी साठी आला. त्याने १५ बॉल मधे ३१ धावांची जबरदस्त फलंदाजी केली पण तोही फार काळ तग धरू शकला नाही. त्यालादेखील सुनील नारायण ने १४ व्या ओवरमध्ये LBW आउट केले. त्यानंतर मोईन अली फलंदाजी साठी आला. मोईन अली ने २० चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या आणि  शिवम मावी ने २० व्या ओवर मध्ये शेवटच्या चेंडूत फाफ डू प्लेसिस ला ५९ बॉल मधे ८६ रन वर कॅच आउट केले. 


चेन्नई सुपर किंग्ज ने २० ओवर मध्ये १९२ धावांचे  मजबूत लक्ष कोलकात्याला दिले.


चेन्नई सुपर किंग्ज - १९२/३ (२०)कोलकाता नाईट रायडर्स फलंदाजी - 


कोलकाता चे बॅटिंग ओपनर्स शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी पॉवर प्ले मधे ५५ रन एकही विकेट न गमावता फलकावर लावले. जशी सुरुवात कोलकाताला पाहिजे होती अगदी तशी भक्कम सुरुवात केली.


 • ११ व्या ओवर मध्ये शार्दुल ठाकूरने व्यंकटेश अय्यर ला (३२ चेंडू ५० धावा)  रवींद्र जडेजा कडे कॅच आणि नितीश राणाला (० रन)प्लेसिस कडे कॅच देण्यास भाग पाडले आणि एका ओवर मध्ये २ विकेट घेतल्या. 

 • १२ व्या ओवरमध्ये  जोश हेजलवूड ने सुनील नारायण ला (२ चेंडू २ रन) वर कॅच आउट केले. 

 • १४ व्या ओवर मध्ये दिपक चहरने शुभमन गिल ला (४३ चेंडू ५१ धावा) वर LBW आउट केले.

 • १५ व्या ओवर मध्ये रवींद्र जडेजा ने दिनेश कार्तिक ला (७ चेंडू ९ धावा) वर कॅच आउट केले. आणि त्याच ओवर मध्ये शाकिब अल हसन ला (१ चेंडू ० धावा) वर LBW आउट केले.

 • १६ व्या ओवर मध्ये शार्दुल ठाकूर ने राहुल त्रिपाठी ला (३ चेंडू २ रन) वर कॅच आउट केले.

 • १७ व्या ओवर मध्ये जोश हेजलवुड ने इयान मॉर्गन ला (८ चेंडू ४ रन) वर कॅच आउट केले.

 • २० व्या ओवर मध्ये ब्रावोने शिवम मावी ला (१३ चेंडू २० रन) वर कॅच आउट केले. 


कोलकाता नाइट रायडर्स ने २० ओवर मध्ये १६५ रन केले. यामधे लॉकी फर्ग्युसन (११ चेंडू १८ रन) आणि वरुण चक्रवर्ती (० चेंडू ० रन) वर नाबाद राहिला.


कोलकाता नाइट रायडर्स - १६५/९ (२०) 

CSK vs KKR २०२१ IPL Final, winner, highlights
PC - INSTAGRAM


चेन्नई सुपर किंग्ज ने कोलकाता वर २७ धावांनी विजय मिळवला आणि चेन्नई सुपर किंग्ज ने आयपीएल मधे चौथ्यांदा ट्रॉफी वर सुवर्ण अक्षरात नाव कोरले.


आयपीएल विजेत्या संघाला किती पैसे दिले जातात?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या