Air India TATA कडे कशी आली?
मित्रांनो काही दिवसापूर्वीच रतन टाटा यांनी एअर इंडिया ला विकत घेतले. ही बातमी वाचली असेलच पण मित्रांनो Air India ही टाटांची आहे हे माहीत नसेल. या article मधे आपण Air India मागे टाटाचा इतिहास आपण पाहणार आहोत.
Air India चा पाया १९३२ मधे J.R.D TATA यांनी उभारला होता. तेव्हापासून सर्व कामगिरी या कंपनीच्या खात्यात नोंदविल्या जातात. ही आशियातील पहिली एअर लाईन होती जी जेट विमानांना आपल्या ताफ्यात जोडायची. १९५३ मधे त्याचे राष्ट्रीयकरण झाले आणि आता पुन्हा एकदा एअर इंडिया टाटांच्या झोळी मधे जाणार आहे. रतन टाटा यांना हे मिळाल्याने खूपच आनंद होणार आहे. कदाचित भावनिक सुद्धा. रतन टाटा यांनी आयुष्यात यशाच्या पायऱ्या खूप चढल्या पण यावेळी ते जे साध्य करण्याच्या अगदी जवळ ते खूपच वेगळे आहे विशेष आहे. त्यांच्या हातात काहीतरी परत येणार आहे. जे त्यांच्या वडिलांना खूप प्रिय होते. हृदयाच्या अगदी जवळ होते. तशी ही एअर इंडिया सरकारसाठी तोट्याचा सौदा झालेली ही एअर इंडिया आता टाटा कडे परत जाणार आहे. टाटा एअर इंडियाच्या खरेदीसाठी प्रबळ दावेदार म्हणून उदयास आले आहे. मात्र टाटा नी Air India साठी बोली जिंकण्याचा वृत्ताला सरकारने नकार दिला आहे. सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की जेव्हा यावर निर्णय घेतला जाईल तेव्हा माध्यमांना माहिती दिली जाईल.
J.R.D टाटा यांचे एअर इंडिया वरील प्रेम यावर लिहिलेल्या पुस्तकाचा भाग सांगतो शशांक शहा यांनी त्यांच्या The TATA Group (From Torchbearers To Trailblazers) या पुस्तकामध्ये J.R.D यांच्या एअर इंडियावरील अपार प्रेमाबद्दल सांगितले आहेत. एअर लाईन काउन्टर त्यांना काही घाण दिसली तर J.R.D TATA हे स्वतः कापड घेऊन ते स्वच्छ करायचे. आणि तिथे उपस्थित लोक हे लाजत असायचे.
एकदा असे काही घडले की त्यांनी आपल्या शर्टच्या बाजू वर केल्या आणि विमानांच्या स्वछतागृहामधे शिरले आणि क्रू मेंबर सोबत शौचालय स्वच्छ करण्यास सुरुवात केली. यावरून तुम्ही पाहू शकता J.R.D TATA यांचे एअर इंडिया वरील प्रेम आणि मनाची श्रीमंती ते कुटलीही लाज न बाळगता स्वतः च सर्व काही करायचे.
टाटां साठी ही विमान सेवा Flying परी सारखी होती. त्यांनी तिची खूप काळजी घेतली. इंटेरियर पासून ते एअर होस्टेस च्या ड्रेस पर्यंत टाटां ची अभिरुची दिसून आली. फेब्रुवारी १९६० मधे एअर इंडिया ने BOEING 707 म्हणून जेट विमान जोडले. आणि त्याचे नाव होते गौरी-शंकर ही JRD TATA ची मोठी देणगी होती की जेव्हा चीन सह आशियातील मोठ्या देशांकडे सुध्दा आधुनिक विमान नव्हते त्यावेळी भारताकडे त्या काळातील सर्वोत्तम विमाने होती. १९५५ मधे चीन चे पंतप्रधान Zhou Enlai असंलग्न चळवळीच्या परिषदेत इंडोनेशिया ला जाणार होते त्यावेळी चीनकडे हे अंतर पार करण्यासाठी सक्षम विमान नव्हते मग चीनचे पंतप्रधान आणि त्यांची टीम एअर इंडिया च्या विमानाने हाँगकाँग ते बांदुग्लाला गेले. JRD TATA हे भारतीय विमान चलनाचे जनक होते.
१९३२ मधे त्यांनी TATA Air Lines ची स्थापना केली होती. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी त्यांनी पहिल्यांदाच उड्डाण केले. JRD TATA यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आणि हे उड्डाण कराची ते बॉम्बे इतके होते जे की पुढे चेन्नई ला गेले. त्या पहिल्या फ्लाईट चे पायलट हे नील विन्सेंट हे होते जे की JRD TATA चे मित्र होते. सुरवातीला कराची - अहमदाबाद - बॉम्बे - भिल्लारी इथपर्यंत हा मार्ग होता पण नंतर मद्रास दरम्यान हवाई सेवा सुरू केली. १९३९ पर्यंत हा मार्ग त्रिवेंद्रम - दिल्ली - कोलंबो आणि लोहार पर्यंत वाढविण्यात आला. तर दुसऱ्या महाुद्धानंतर TATA AIR LINES चे १९४६ मधे मर्यादित कंपनीमध्ये रूपांतर झाले. आणि नवीन कंपनीचे नाव हे AIR INDIA LIMITED असे झाले. दोन वर्षानंतर टाटा नी १९४८ मधे AIR INDIA INTERNATIONAL नावाची दुसरी कंपनी स्थापन केली आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा ही सुरू केली.
त्यानंतर मुंबई आणि कैरो, जिनिव्हा आणि लंडन दरम्यान हवाई सेवा सुरू केली.
१९५३ मधे भारत सरकारने सर्व भारतीय विमान कंपन्याचे राष्ट्रीयकरण केले. देशांतर्गत उड्डाण सेवेसाठी INDIAN AIR LINE CORPORATION आणि आंतरराष्ट्रीय सेवेसाठी AIR INDIA INTERNATIONAL CORPORATION तयार झाली. AIR INDIA INTERNATIONAL चे १९६२ मधे AIR INDIA असे नामकरण करण्यात आले. २००७ मधे सरकारने एअर लाईन चे एअर इंडिया मधे विलनिकरण केले. आणि आता नुकसानाने त्रस्त झालेले सरकार हे AIR INDIA विकत आहे. त्यासाठी टाटा नी सर्वाधिक बोली लावली आहे. जर सर्वकाही ठीक झाले तर लवकरच AIR INDIA ही तिच्या घरी परतणार आहे. म्हणजेच ती आपल्या जुन्या मालकांकडे म्हणजेच आपल्या रतन टाटांकडे पोहोचणार आहे.
तर हा होता AIR INDIA मागील टाटांचा इतिहास आवडले असेल तर मित्रांबरोबर शेअर करा.
हे वाचा.
Apple iPhone 13 Series ची विक्री सुरू, बघा ऑफर्स किंमत.
0 टिप्पण्या