आयपीएल विजेत्या संघाला किती पैसे दिले जातात?
आज आपण आयपीएल विजेत्या संघाला किती पैसे दिले जातात? हे पाहणार आहोत. आयपीएल ही केवळ देशातच नाही तर पूर्ण जगभरातील सर्वात मोठी लीग आहे ज्याचे चाहते हे पूर्ण जगभरातच आहेत. हे आर्टिकल आपण आयपीएल विजेत्या संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम दिली जाते? आणि पराभूत संघाला पैसे भेटतात का नाही हे पाहणार आहोत.
PC - Wikipedia |
आयपीएल ची २०२० मधे एकूण रक्कम ही ४१.२५ कोटी इतकी होती. जे की २०२० मधे विजेता संघ हा मुंबई इंडियन्स होता ज्यांना अंतिम फेरी विजयासाठी २० कोटी रुपये दिले होते. तर अंतिम फेरी हरलेला संघ म्हणजेच दिल्ली कॅपिटल यांना १२.५ कोटी रुपये देण्यात आले होते. यावरून आपणास समजले असेलच की उपविजेत्या संघालाही पैसे मिळतात. पण बाकीचे ६ संघ देखील आहेत कारण आयपीएल मधे एकूण ८ संघ असतात त्यापैकी ४ एलिमिनेशन फेरीतच काढले जातात. आणि पात्र ४ संघ क्वालिफाय होतात. तर या चारही पात्र संघांना हे बक्षीस दिले जाते. यामधे विजेत्याला २६ कोटी, उपविजेत्याला १२.५ कोटी आणि ३ आणि ४ नंबरच्या संघाला ८.७५ कोटी इतके रुपये मिळतात. फक्त ४ संघानाच हे पैसे दिले जातात. आणि जे संघ एलीमिनेशन फेरीत पोचलेले नसतात त्यांना काहीच दिले जात नाही.
BCCI आणि आयपीएल च्या नियमांनुसार विजेत्या संघाने जी बक्षीस रक्कम जिंकलेली असेल त्याच्या ५०% फ्रेंचायझी च्या नावावर असतात तर उर्वरीत ५०% हे संघाच्या नावावर असतात.
२०२० च्या आयपीएल प्रमाणे २० कोटी जे की विजेत्या संघाचे बक्षीस आहे त्यातील १० कोटी हे फ्रेंचायझी चे असतील आणि बाकी १० कोटी हे संघामध्ये वितरीत केले जाते. BCCI च्या नियमांनुसार प्रत्येक संघाला कमीत कमी १८ खेळाडू आणि जास्तीत जास्त २५ खेळाडू खरेदी करता येतात. आणि फ्रेंचायझी ८ पेक्षा जास्त परदेशी खेळाडू घेता येत नाही आणि जरी ८ खेळाडू घेतले तरी त्यातील फक्त ४ खेळाडू सामन्यामध्ये खेळवता येतात.
• IPL संघ मालक, खेळाडू किती आणि कसे पैसे कमावतात ?
• टी-२० विश्वचषक २०२१ वेळापत्रक
आपल्यापुढे अजून एक प्रश्न तयार होतो की हा इतका महागडा खेळ आहे ज्यावेळी फ्रेंचायझी १८ खेळाडू विकत घेतात तेव्हा बरेच पैसे जात असतील? येथे कमीत कमी ६० ते ७० कोटी सहज खर्च होतात तर फ्रेंचायझी कडे इतके पैसे येतात कुठून? तर फ्रेंचायझी कडे हे पैसे टीव्ही जाहिराती कडून, आयपीएल च्या शीर्षक प्रायोजकाकडून मिळतात.
खेळाडूंना रोख बक्षीस स्वरूपातही काही रक्कम दिली जाते जसे की पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जे सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. इमर्जिंग प्लेअर अवॉर्ड, परफेक्ट कॅच ऑफ द सीझन याला देखील १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. सुपर स्ट्रायकर ऑफ लीग १ लाख आणि कार जाहिराती वाले १ कार बक्षीस देतात. तसेच मॅन ऑफ द मॅच लीग मॅच असेल तर त्यात १ लाख रुपयांचे बक्षीस देतात आणि प्ले ऑफ आणि फायनल मॅच असेल तर ५ लाख रुपये दिले जातात.
अशा प्रकारे आयपीएल मधे खेळाडू आणि संघांना बक्षीस दिले जाते.
0 टिप्पण्या