हे केले तरच जाईल मुंबई इंडियन्स play-off मध्ये | RCB ला टॉप २ मधे जाण्यासाठी काय करावे लागेल?

 कशा प्रकारे मुंबई इंडियन्स जाईल play-off मध्ये? RCB ला टॉप २ मधे जाण्यासाठी काय करावे लागेल?

Mumbai Indians in play-off, RCB in Top २
PC - www.sportskeeda.com


कोलकत्ता नाईट रायडर्स ने राजस्थान रॉयल्स बरोबरच्या ५६ व्या सामन्यात खूप मोठ्या फरकाने सामना आपल्या खिशात घातला. त्यांच्या या विजयामुळे play-off मध्ये स्थान मिळवण्याचे युद्ध खूपच रोमांचक झाले आहे. KKR ची टीम १४ पॉइंट्स बरोबर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे आणि कालच्या मॅच मुळे त्यांचा रनरेट ही मजबूत झाला आहे. त्यामुळेच आता मुंबई आपल्या नशिबावर अवलंबून आहे. 

मुंबई चे play-off मधे जाणे हे खूपच अवघड झाले आहे. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ला जर play-off madhe जायचं असेल तर मुंबई इंडियन्स ला १७० धावांपेक्षा अधिक फरकाने सामना जिंकावा लागेल. याच्यानंतरच मुंबई ची टीम play-off मधे क्वालीफाय करू शकेल. याचा अर्थ असा की मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २५० धावांचा स्कोर केला तर त्यांना हैद्राबाद ला खूप कमी धावांमधे पूर्ण संघ बाद करावा लागेल. जे की खूपच अवघड आहे. आणि जर मुंबईला नंतर फलंदाजी करायची झाल्यास ते कोलकत्ता च्या रनरेट पर्यंत पोहोचू शकत नाही. जरी मुंबई जिंकली तरी त्या रनरेट पर्यंत पोहोचू शकत नाही. 

गुणतालिकेत मुंबई १२ पॉइंट्स बरोबर सहाव्या स्थानी आहे आणि मुंबई चा रनरेट -०.०४८ हा आहे.  

या सगळ्याचा असा अर्थ होतो की जेव्हा टॉस होईल तेव्हाच या सामन्यांचा निकाल जाहीर होईल. आणि आपल्याला आयपीएल २०२१ चे टॉप ४ संघ मिळतील.


RCB ला जर टॉप २ मधे स्थान मिळवायचे असेल तर हे करावे लागेल.


जर RCB ची पहिली फलंदाजी असेल तर दिल्ली कॅपिटल चा १५५+ पेक्षा अधिक धावांच्या फरकाने पराभव करावा लागेल जे की T२० मधे खूपच अवघड आहे. आणि जर दुसऱ्यांदा फलंदाजी असेल तर ज्या काही धावांचे दिल्ली लक्ष देईल त्या लक्षाला १०० चेंडू ठेऊन जिंकावे लागेल. 


हे वाचा.

टी-२० विश्वचषक २०२१ वेळापत्रक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या