टी-२० विश्वचषक २०२१ | तिकिटांची विक्री | भारताचे सामने
![]() |
PC - www.Geo.tv |
संयुक्त अरब अमिराती आणि ओमान मधे १७ ऑक्टबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2021) स्पर्धेपूर्वी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. या स्पर्धेच्या दरम्यान मैदानाच्या क्षमतेच्या ७० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे. ICC आणि या स्पर्धेच्या यजमान असलेल्या BCCI ला संयुक्त अरब अमिराती सरकारने ही परवानगी दिली.
ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अलार्डीस यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. यात त्यांनी म्हंटले आहे की 'आम्ही ओमान आणि संयुक्त अरब अमिराती क्रिकेट चाहत्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत.'
मागील टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2021) स्पर्धेला ५ वर्ष झाली आहेत. आम्ही जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंची आगामी टी-२० विश्र्वकरंडक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळ पाहण्यास उत्सुक आहोत, असेही अलार्डिस यांनी सांगितले.
दरम्यान, टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2021) स्पर्धेला १७ ऑक्टोबर रोजी ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. सुपर १२ स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २३ ऑक्टोबर रोजी तर भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
तिकिटांची विक्री सुरू (How To Buy T20 World Cup 2021 Tickets) -
ICC टी-२० विश्वचषकाच्या तिकिटांची विक्री सुरू केली आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेसाठी तिकिटांची सुरुवातीची किंमत ओमान मधील १० ओमानी रियाल म्हणजेच जवळपास २ हजार रुपये आणि यूएई मधे ३० दिरहम म्हणजेच 600 रुपयाच्या आसपास ठेवण्यात आली आहे. आयसीसी ने दिलेल्या वृत्तानुसार www.t20worldcup.com/tickets या वेबसाइटवरून तिकिटे खरेदी करता येतील.
भारताचे विश्वचषकातील सामने
भारत विरुद्ध पाकिस्तान (२४ ऑक्टोबर )
भारत विरुद्ध न्यूझीलंड (३१ ऑक्टोबर )
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (३ नोव्हेंबर )
भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पहिला पात्र संघ (५ नोव्हेंबर )
भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील दुसरा पात्र संघ (८ नोव्हेंबर )
हे वाचा.
टी-२० विश्वचषक २०२१ वेळापत्रक
0 टिप्पण्या