अबब! एवढा आहे T-20 World Cup मध्ये भारत - पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांचा दर
T20 विश्वचषक स्पर्धेला १७ ऑक्टबरपासून सुरुवात होणार आहे. यामधे भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर ला पाकिस्तान विरुद्ध दुबईला होणार आहे. भारत पाकिस्तान या सामन्यासाठी तिकिटांचा दर सुमारे २ लाख रुपये ठेवण्यात आला आहे. इतर सामन्यापेक्षा या तिकिटांचा दर ३३३ पट जास्त आहे. दुबई च्या स्टेडियम मधे वेगवेगळ्या स्टँड मधल्या तिकिटांची किंमत वेगवेगळी आहे. १२,५०० रुपयांपासून या तिकिटांना सुरुवात होत आहे. याशिवाय ३१,२०० रुपये आणि ५४,१०० रुपयांना प्रीमियम आणि प्लॅटिनम स्टँड मधे बसून सामना पाहता येणार आहे. या तिन्ही ठिकाणची तिकीटे संपली आहेत. पण भारत पाकिस्तान सामन्याच्या व्हीआयपी स्टँड आणि स्काय बॉक्स चे तिकीट दर अजून जाहीर करण्यात आलेले नाहीत.
भारत न्यूझीलंड यांच्यात ३१ ऑक्टोबर ला होणाऱ्या व्हीआयपी स्टँड चे तिकीट १ लाख ९६ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्याच्या व्हीआयपी स्टँड चे दर आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. भारत न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्याच्या तिकिटाचे कमीत कमी दर १०,४०० रुपये आहे.
T-२० विश्वचषकाचा हा ७ वा मोसम आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. याआधी २०१६ मधे भारतात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वेस्ट इंडीज ने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला होता.
२००७ मधे भारताने पहिला आणि एकमेव टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताला एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. १४ वर्षांची ही प्रतीक्षा संपवण्यासाठी भारत यंदा मैदानात उतरेल.
हे वाचा.
IPL संघ मालक, खेळाडू किती आणि कसे पैसे कमावतात ?
टी-२० विश्वचषक २०२१ | किती प्रेक्षकांना मिळणार मैदानावर प्रवेश?
टी-२० विश्वचषक २०२१ वेळापत्रक संघ आणि ग्रुप
दिपक चहर ने कोणाला केला प्रपोज?
0 टिप्पण्या