सुप्रसिध्द अभिनेता पुनीत राजकुमार यांचे निधन
साऊथ (कन्नड) अभिनेता पॉवर स्टार पुनीत राजकुमार उर्फ अप्पू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. हृदविकाराचचा झटका आल्यानंतर पुनीत यांना बेंगळूर च्या विक्रम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. ही बातमी कळताच पुनीत राजकुमार यांचे चाहते, काही अभिनेते, प्रोड्यूसर यांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी केली होती आणि पुनीत राजकुमार यांच्यासाठी प्रार्थना देखील करत होते. त्यांच्यावर आयसीयू मधे उपचार चालू होते. तरीही त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
पुनीत राजकुमार यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी हृदयविकराच्या झटक्याने अखेरचा श्वास घेतला. ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पुनीत यांचा जन्म १७ मार्च १९७५ मधे चेन्नई येथे झाला होता. त्यांना ५ बहीण भाऊ आहेत आणि ते सर्वात लहान होते. पुनीत यांचा मोठा भाऊ शिवा राजकुमार हेदेखील प्रसिद्ध अभिनेता आहेत.
पुनीत राजकुमार यांनी काही वर्षापूर्वीच त्यांचे आई वडील गमावले होते. त्यांच्या मागे त्यांची बायको आणि २ मुली आहेत. पुनीत राजकुमार यांना फिटनेस आणि डान्सची फार आवड होती. पुनीत यांना कर्नाटक फिल्म चा अमिताभ बच्चन देखील बोलले जात होते. पुनीत यांनी जवळपास ३० पर्यन्त सुपरहिट चित्रपट कन्नड चित्रपट सृष्टीला दिलेले होते.
👉 ❤️ हे वाचा आवडेल ❤️ 👈
त्यांच्या करीअर ची सुरुवात ही १९८५ मध्ये बालकलाकार म्हणून झाली होती. त्यांना बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट हे नॅशनल फिल्म अवॉर्ड देखील त्यांना मिळालं होत.
• पुनीत राजकुमार यांचे काही चित्रपट -
पुनीत यांनी आपल्या लीड रोल ची सुरुवात अप्पू या चित्रपटातून केली होती. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले त्यामधे अंजनी पुत्र, अण्णा बाँड, मायाबाझार, राजकुमार, अभि, आकाश, मौर्य, बिंदास, अजय, मिलाना, अर्सू, नम्मा बसवा, राज- द शो मॅन यासारखे चित्रपट दिले.
अशा पद्धतीने एक मोठा कलाकार कन्नड चित्रपट सृष्टीने गमावला असेच म्हणावे लागेल. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच सदिच्छा!!!
हे वाचा.
• पाहा नागराज मंजुळे याच्या नवीन चित्रपटाची माहिती
0 टिप्पण्या