चेन्नई सुपर किंग्ज ने आयपीएल नंतर जिंकली पुन्हा एकदा मने.
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१ शीर्षक जिंकल्यानंतर चेन्नई चा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने त्यावर प्रतिक्रिया दिली आणि सॅम करन ला चेन्नई सुपर किंग्जने भावूक करून टाकले.
PC - INSTAGRAM |
सॅम करनला संयुक्त अरब अमिरातीच्या स्पर्धेच्या दरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या 2021 च्या काही सामन्यामधून वगळण्यात आले होते. कारण सॅम करनला दुखापतीमुळे टी २० विश्वचषकासाठी तंदुरुस्त रहावे म्हणून इंग्लंड क्रिकेटने आराम घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामूळे उर्वरीत सामन्यात तो मायदेशी परतला होता.
चेन्नई सुपर किंग्जच्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा किताब जिंकण्यात खारीचा वाटा हा इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करनचाही आहे.
सॅम करनच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल २०२१ मधील शेवटचे तीन सामने खेळावे लागले. चेन्नईचा संघ त्यांच्या मुख्य अष्टपैलू शिवाय प्लेऑफमध्ये संघर्ष करेल असे वाटत होते पण ब्रावोने त्याची कमी भासू दिली नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
• आयपीएल विजेत्या संघाला किती पैसे दिले जातात?
• IPL संघ मालक, खेळाडू किती आणि कसे पैसे कमावतात?
• टी-२० विश्वचषक २०२१ वेळापत्रक
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
रूतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, शार्दुल ठाकूर आणि रॉबिन उथप्पा यांच्या काही चमकदार कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्सने प्रथम दिल्ली कॅपिटल्सला क्वालिफायर 1 सामन्यात पराभूत केले आणि नंतर कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करून विजेतेपद पटकावले.
ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने एक हृदयस्पर्शी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
एडिट न केलेला फोटो |
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२१ च्या फायनल मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून 4 वेळा आयपीएल विजेते बनले तेव्हा सॅम करन ड्रेसिंग रूममध्ये नव्हता. सुपर किंग्सने एक गोड फोटो एडिट करून ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करणाऱ्या टीमसोबत सॅम करन चा फोटो एडिट करून पोस्ट केला.
एडिट केलेला फोटो |
त्यांनी तो फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि सॅम करनकडून "विशेष, धन्यवाद." असे उत्तर देखील आले.
• ह्रदयस्पर्शी फोटो पाहून सॅम करन काय म्हणाला?
"या हंगामात मला चेन्नईसोबतचा माझा वेळ खूप आवडला. टीममधील सर्वच खेळाडू खूप चांगली कामगिरी करत आहेत. मला मायदेशी जाताना संघ सोडून जावे हे वाटत नव्हते. चेन्नई सुपर किंग्ज म्हणजे एक विलक्षण दुनिया आहे." सॅम करनने हे आयपीएल 2021 मधून वगळल्याच्या बातमीनंतर म्हटले होते. यानंतरही तो चेन्नई सुपर किंग्ज चा भाग बनण्यास उत्सुक असेल.
0 टिप्पण्या