कोण आहे सोनाली पाटील? मराठी बिगबॉस सीजन ३ स्पर्धक सोनाली पाटील | Sonali Patil Biography
सोनाली पाटीलने मराठी बिग बॉस सीझन ३ मधे आपली भाषा, व्यक्तिमत्व, आणि सौंदर्याच्या बळावर अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. चला तर पाहूया सोनाली पाटील विषयी अजून काही.
PC - INSTAGRAM |
नाव - सोनाली पाटील
जन्म - ५ मे १९९०
छंद - जेवण बनवणे, pistol प्रॅक्टिस.
सोनाली पाटील चा जन्म इस्लामपूर मधे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. सध्या ती कोल्हापूर (महाराष्ट्र) मधे आपल्या कुटुंबासोबत राहते. तिचे वय २०२१ मधे ३१ वर्षे इतके आहे. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मोडेल आहे. सोनाली पाटीलने तिचे शालेय शिक्षण ताराराणी विद्यापीठ, उशाराजे विद्यालय कोल्हापूर मध्येच पूर्ण केले. पुढील शिक्षण देखील राजाराम कॉलेज कोल्हापूर येथेच पूर्ण केले. तिचे शिक्षण मास्टर ऑफ आर्ट्स (MA) आणि मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (BEd) हे झाले आहे. सोनाली ही एक शिक्षिका असून तिने तब्बल ३ वर्ष वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून देखील काम केले आहे. सोनाली शॉर्ट व्हिडिओ साठी देखील खूप प्रसिध्द आहे. तिला TikTok गर्ल म्हणूनही ओळखलं जातं. सोनालीने खूप छोट्या छोट्या भूमिका करून एवढा मोठा पल्ला गाठला आहे. तिचे आयुष्यात खूप मेहनत आणि स्ट्रगल केले आहे.
सोनाली पाटीलने २०१८ मधे 'जुळता जुळता जुळतयं की', घाडगे अँड सून, देव पावला, २०२० मधे 'देवमाणूस' आणि 'वैजू नं.१' यासारख्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या सर्व मालिकेतील अभिनयाने सोनाली लोकप्रिय झाली. तिला लहानपणापासून च अभिनयाची आवड होती.
PC - INSTAGRAM |
वैजु नं. १ मध्ये सोनाली कशी आली?
सोनाली पाटील घाडगे अँड सून मालिका करत असताना वैजू साठी ऑडिशन सुरू होते ज्याबद्दल तिला जराही अंदाज नव्हता. पण त्या ऑडिशन साठी तिला सतत कॉल येत होता. त्यानंतर ती ऑडिशन साठी संजय जाधव यांच्या ऑफिसमधे गेली. ऑडिशन चांगल्या प्रकारे पार पाडले. त्यानंतर घाडगे अँड सून मालिकेचे शूटिंग संपले आणि ती गावाला जाण्यासाठी निघाली परंतु जाण्याआधी तिने संजय जाधव यांच्या ऑफिसमधे कॉल करून ती गावाला जात असल्याचं कळवल. पण संजय जाधव यांनी तिला २ दिवस थांब असे सांगितलं. आणि तिला २ दिवसांनी तिचे वैजू सेलेक्शन झालं हे तिला समजलं.
सोनाली ला भरलेली वांगी, कोल्हापुरी मटण, तांबडा पांढरा रस्सा आणि गव्हाची खीर हे पदार्थ खूप आवडतात. सोनाली पाटीलला इंडियन कपडे खूप आवडतात. त्यात तिला साडी खूप आवडते. तिला स्वित्झर्लंड आणि ऐतिहासिक जागी जायला खूप आवडते. तिला माधुरी दीक्षित, किशोर कुमार आणि मधुबाला यांचे चित्रपट आवडतात. सोनालीला सांगोला जिल्ह्यात नवोदित कलाकारांमध्ये ज्याने कमी वेळात खूप इम्प्रोवमेंट केली त्यासाठी तिला स्मिता पाटील पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होत. जेव्हा वैजुच शूट सुरु झाले होते त्या दिवसातच सोनालीने वडील वारले.
तर ही होती सर्वांची लाडकी सोनाली पाटील यांची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा.
हे वाचा.
• कोण आहे विशाल निकम? Vishal Nikam Biography.
• Meenal Shah बद्दल माहिती.
0 टिप्पण्या