Squid Games चा भारताबरोबर काय संबंध आहे? अनुपम त्रिपाठी बायोग्राफी
PC - INSTAGRAM |
साऊथ कोरियन वेबसीरीज स्क्विड गेम मधे लहानपणी खेळल्या जाणाऱ्या खेळांना काही वेगळ्या आणि नवीन पद्धतीने दाखवले आहे.
या शो ला रिलिज होऊन फक्त एकच महिना झाला आहे. आणि या स्क्विड गेम शोने नेटफ्लिक्स वर धुमाकूळ घातला आहे. सध्या हा शो Netflix वर नंबर वर सगळ्यात जास्त बघितला जाणारा शो आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजे या शो मधे एक भारतीय अभिनेता सुद्धा आहे जे की भारताला अभिमानास्पद आहे.
PC - INSTAGRAM |
स्क्विड गेम मधे प्लेअर नंबर १९९ ज्याचे नाव आहे अली अब्दुल ज्याला शो मध्ये पाकिस्तानचा रहिवाशी दाखवला आहे आणि ही भूमिका कोणी दुसऱ्याने नाही तर भारताचा अभिनेता अनुपम त्रिपाठी यांनी ही अलीची भूमिका साकारली आहे. शो मधे जरी तो पाकिस्तानचा दाखवला असला तरी तो भारताचा रहिवासी आहे. अनुपम त्रिपाठी दिल्लीचे राहणारे आहेत. ते इतके लोकप्रिय झाले आहेत की शो रिलिज झाल्यानंतर काही दिवसातच इंस्टाग्रामवर ३० लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स झाले आहेत. आणि बातमीनुसार असे कळते की त्याचे प्रत्येक दिवशी जवळ जवळ १ लाखाने फॉलोवर्स वाढत आहेत. कारण पूर्ण शो मधे अलीच्या अभिनयाने वेड लावले आहे.
PC - Instagram |
अनुपम त्रिपाठी यांचा जन्म २ नोव्हेंबर १९८८ ला दिल्ली मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. २००५ मध्ये अनुपम ने स्टेज प्रोडक्शन मध्ये देखील काम केले. ते काम करत असताना अनुपम यांना एवढी मजा येऊ लागली की ते अभिनय पण करू लागले. २००६ मध्ये त्यांनी एक थिएटर ग्रुप जॉईन केला. काही वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर अनुपम यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा जॉईन करण्याचा विचार केला. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितली त्यावर मित्र म्हणाले की कोरियन नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स मधे ॲप्लlय करण्याचा सल्ला दिला. तो सल्ला अनुपम यांना भारी वाटला. पण हे घरी सांगितलं तर मम्मी पापा जाऊन देणार नाही असा विचार त्यांनी केला. मग त्यांनी घरी न सांगताच कोरियन युनिव्हर्सिटी ला ॲपलाय केलं. आणि ते त्याची परीक्षा देखील पास झाले. तेव्हा कुठे त्यांनी ही गोष्ट घरी सांगितली.
सुरवातीला अनुपम च्या घरच्यांना हि गोष्ट खटकली पण नंतर कोरिया ला जायची परवानगी दिली. २०१० मध्ये कोरियाला गेल्यानंतर अनुपमने केवळ दोनच वर्षात कोरियन भाषा शिकून घेतली. शिक्षण चालू असतानाच ते विविध जाहिरातींमध्ये काम देखील करत होते. २०१४ मध्ये त्यांनी Ode to My Father हा चित्रपट साईन केला. साऊथ कोरिया मधे हा चित्रपट खूप गाजला होता. याच चित्रपटाचा रिमेक हिंदीमध्ये ही आला होता ज्यामधे आपल्याला सलमान खान पाहायला मिळतो तो म्हणजे भारत हा चित्रपट. त्यानंतर आत्ता म्हणजे २०२१ मधे स्क्विड गेम वेबसिरीज मुळे फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात अनुपम यांना ओळख मिळाली. अनुपम एका मुलाखतीत म्हणाले की मला आपल्या देशात आणि आपल्या भाषेमध्ये चित्रपट करायला आवडतील.
तुम्हाला स्क्विड गेम मधे भारतीय अभिनेता अनुपम त्रिपाठी चा अभिनय कसा वाटला कॉमेंट मधे नक्की सांगा.
0 टिप्पण्या