येवले चहाचा उदय कसा झाला? येवले चहाची फ्रेंचाईझी कशी घ्यायची?
PC - zbrushcentral.com |
येवले चहा चे मालक, डायरेक्टर, फाऊंडर, हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गाव आस्करवाडी येथील एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणजेच नवनाथ येवले हे त्यांचे नाव. एकेकाळी त्यांच्याकडे जेव्हा त्यांच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा बर्फी घेण्याइतकी ही ऐपत नव्हती एवढे ते गरीब घराण्यातील होते. १९८० च्या आधी त्यांचे आजोबा हे शेती करत होते आणि त्या शेतीवर त्यांचे घर चालत नव्हते म्हणून त्यांनी नवनाथ येवले यांच्या वडिलांना घेतलेले कर्ज फेडावे म्हणून पुण्याला एका अमृततुल्य मधे कामाला लावले. तिथे गेल्यावर त्यांना वाटले की शेतीला जोडधंदा म्हणून २ म्हशी घेऊन दिल्या. मग दुधाचा व्यवसाय चालू झाला. तेच दूध नवनाथ येवले यांचे आजोबा पुण्याला मार्केट मधे जाऊन विकू लागले.
नंतर नवनाथ यांच्या वडिलांना वाटले की आपण या अमृततुल्य मधे किती दिवस काम करणार का नाही आपण स्वतः चहा चे दुकान टाकू नये. मग त्यांनी एका मित्राला सोबत घेऊन पुण्यात कॅम्प मधे स्वतः चे चहाचे दुकान चालू केले. जवळजवळ २ वर्षे ते दुकान त्यांनी चालवले. मग त्यांना वाटू लागले की आपले स्वतःचे दुकान असावे ते टाकण्यासाठी लागणारे भांडवल कमी पडत होते. मग त्या वेळेस नवनाथ यांच्या वडिलांनी त्यांच्या आईचे दागिने मोडून भांडवल तयार केले आणि पुण्यात स्वतःचे दुकान चालू केले. आणि त्या दुकानाला श्री गणेश अमृततुल्य हे नाव देण्यात आले. आणि त्याचवेळेला म्हणजे १९८३ साली नवनाथ येवले यांचा जन्म झाला. त्यावेळेला ही दुकानावर रांगा लागायच्या एवढी चहाला पसंती होती.
नवनाथ येवले यांनीही तब्बल ३२ छोट्या मोठ्या व्यवसायात उडी घेऊन खूप सारा अनुभव घेतला. आणि त्यातही ते साफ असफल झाले. मग त्यांनी सर्वप्रथम भारती विद्यापीठ परिसरात एका छोट्या टपरी मधे चहाचा व्यवसाय चालू केला. २०११ ते २०१७ मधे जे काही ते शिकले होते त्याचा ते या टपरी मधे प्रयोग करत होते. जसजसे तिथे ते काम करायला लागले. त्यांच्या आसपासच्या ४/५ चहाच्या टपऱ्या होत्या त्यांचा २० ते २५ लिटर चहाचा व्यवसाय होता पण नवनाथ येवले हे एक ते दीड महिन्यांच्या कालावधीतच ३५ ते ४० लिटर चा धंदा करू लागले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ही वाढत होता. कारण लोकांनीही त्यांच्या चहाला पसंती दिली होती.
मग नवनाथ येवले यांनी ठरवले की आता आपण ब्रॅण्डिंग करून आपल्या प्रॉडक्ट ला मार्केट मधे उतरवले पाहिजे. त्यांनी पुण्यामधील सेंटर लोकेशन म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई परिसरात त्यांनी जागा निवडली. जेव्हा ते त्या जागा मालकाशी बोलत होते की आम्हाला भाड्याने दुकान पाहिजे तेव्हा त्या जागेचे भाडे १ लाख २० हजार एवढे होते. ज्यावेळी जागा मालक म्हणाला की तुम्ही येथे काय विकणार आहात त्यावर नवनाथ येवले म्हणाले आम्ही चहा विकणार आहोत. जागा मालक म्हणला की चहा किती रुपयांचा आहे. नवनाथ म्हणाले दहा रुपयांचा त्यावर जागा मालक म्हणाला की तुम्ही १० रुपयाच्या चहावर १ लाख २० हजार भाडे कसे देणार नक्की चहाच विकणार आहात का दारू वगैरे.
९ फेब्रुवारी २०१८ ला त्यांनी पहिली येवले अमृततुल्य ची शाखा उघडली. दुसऱ्याच दिवशी त्यांना ज्या प्रकारचा प्रतिसाद हवा होता तो मिळाला आणि तिथून पुढं येवले अमृततुल्य चा प्रवास हा खूप जोमाने चालू झाला. आणि आपण आता पहातच आहोत की आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जवळ जवळ २९० फ्रेंचाईजी पर्यंत पोहोचले आहेत. आणि येवले अमृततुल्य चा टर्नओव्हर ४० कोटी पर्यंत आहे.
जर तुम्ही देखील त्यांची फ्रेंचाईजी घेण्यासाठी इच्छुक असाल तर खाली वाचा.
• येवले चहा फ्रेंचाईजी फायदेशीर आहे का?
जर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की येवले चहा फायदेशीर आहे की नाही, तर निश्चित उत्तर होय होय येवले चहा एक फायदेशीर व्यवसाय आहे. कारण चहा फ्रँचायझी मार्केट वेगाने विकसित होत आहे.जर तुम्ही तरुण आहात आणि चहा फ्रँचायझीमध्ये व्यवसाय करण्यास इच्छुक असाल तर हे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल.
1. येवले चहा फ्रँचायझी खर्च -
तर एकूण येवले चहा फ्रँचायझीची किंमत सुमारे 1,300,000 रुपये इतकी आहे. तुम्हाला जर येवले चहा ची फ्रँचायझी घ्यायची असेल तर खाली वाचा.गुंतवणूकीची रक्कम : 1,300,000 रुपये
फ्रँचायझी फी : 300,000 रुपये
इंटिरियर डिझाईन, इलेक्ट्रीशियन वर्क, हार्डवेअर आणि एसीपी पॅनेल बोर्डसाठी 400,000 रुपये गुंतवणूकीची आवश्यकता आहे
बिलिंग काउंटर, रेफ्रिजरेटर, कूलर, मिल बॉयलिंग मशीन, मिल्क केन आणि गॅस पाइपलाइनची किंमत सुमारे 410,000 रुपये असेल.
किचन उपकरणे आवश्यक सुमारे 70,000 रुपये.
जाहिरात आणि इतर संबंधित साहित्यासाठी, कंपनीने सुमारे 150,000 रुपये जोडले आहेत.
आउटलेट लाँच एक्सपेंन्स सुमारे 100,000 रुपये आहे.
सॉफ्टवेअर, बिलिंग टॅब, सीसीटीव्ही, एलईडी, वाय-फाय कनेक्शनसाठी सुमारे 92,800 रुपये शुल्क आकारले जाईल
हाउसकीपिंग आणि मटेरियलसाठी अंतर्भूत शुल्क 67,800 रुपये असेल.
येवले चहा फ्रँचायझी : 100,000 रुपये मासिक अपेक्षित नफा
येवले अमृततुल्य फ्रँचायझीसाठी आवश्यक क्षेत्र: 250-300 SqFt
2. येवले टी फ्रँचायझी तपशील -
येवले स्वयंपाकघरात रेफ्रिजरेटर, कूलर, मिल उकळण्याची मशीन लागते.
सुरक्षेसाठी, सॉफ्टवेअर, बिलिंग टॅब, सीसीटीव्ही, वाय-फाय कनेक्शन असावे.
येवले फ्रेंचायझर फ्रँचायझी अटींसाठी 5 वर्षांसाठी मताधिकार प्रदान करेल.
येवले चहाच्या दुकानासाठी 365 दिवस सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत वेळ पाहिजे.
येवले टी फ्रँचाईज परवाना
३. फर्मची नोंदणी -
तुम्ही येवले टी हाऊस व्यवसाय एकतर मालकी किंवा भागीदारी फर्म सुरू करू शकता. जर तुम्ही येवले टी हाऊसचा व्यवसाय एक व्यक्ती कंपनी म्हणून सुरू करत असाल तर तुम्हाला तुमची कंपनी मालकी म्हणून नोंदणी करावी लागेल. भागीदारी ऑपरेशनसाठी, तुम्हाला मर्यादित दायित्व भागीदारी (एलएलपी) किंवा प्रा. लि. कंपनी ऑफ रजिस्ट्रार ऑफ कंपनी (रॉक).४. जीएसटी नोंदणी -
जीएसटी क्रमांक मिळवा (जीएसटी नियमानंतर सर्व व्यवसायासाठी अनिवार्य), कर ओळख क्रमांक आणि विमा प्रमाणपत्र५. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) -
येवले अमृततुल्य फ्रँचायझी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री अंतर्गत श्रेणी आहेत. म्हणून, आपण FSSAI परवाना प्राप्त केला पाहिजे.६. ट्रेड मार्क -
येवले चाहा ब्रँड नेम ट्रेडमार्कसह नोंदणी करा जे तुमच्या ब्रँडचे संरक्षण करेल आपण स्टार्टअप प्राधिकरणाकडून सर्व परवाना दुवा देखील मिळवू शकता.७. येवले चहा फ्रँचायझी संपर्क -
येवले चहा मुख्य कार्यालयाचा पत्ताफ्लॅट क्रमांक 101,
पहिला मजला, सिल्व्हर पॉईंट,
201/1, कात्रज-कोंढवा रोड,
कोंढवा, पुणे - 411046
८. येवले टी फ्रँचायझी संपर्क क्रमांक -
+91 8181 00800९. येवले टी फ्रँचाइजी ईमेल आयडी -
yewaleamruttulya@gmail.com१०. येवले चहा अधिकृत वेबसाइट
www.yewale.com• येवले चहा फ्रँचायझी कशी मिळवायची ?
तुम्ही मुख्य कार्यालयाला भेट देऊन येवले अमृततुल्य फ्रँचायझी मिळवू शकता किंवा या सुवर्ण व्यवसायाच्या संधीसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील करू शकता.• मताधिकार मिळवण्यासाठी हा फॉर्म भरा:
http://Yewaleamruttulya.com/ApplicationForm1.aspxजर तुम्ही येवले चहा फ्रँचायझीसाठी शॉर्टलिस्ट झालात तर येवले फ्रँचायझर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी कॉल करतील.
हे वाचा.
T२० वर्ल्ड कप २०२१ टाइमटेबल
0 टिप्पण्या