टीम इंडिया ची जर्सी बदलली | पाहा कोणत्या जर्सी मधे दिसतील टीम इंडियाचे खेळाडू
BCCI ने काही दिवसापूर्वीच सांगितले होते की वर्ल्ड टी-२० विश्वचषक २०२१ या दौऱ्यासाठी नवीन जर्सी ची घोषणा करण्यात येईल. नवीन जर्सी १३ ऑक्टोबर ला लाँच झाली होती. भारताला मिळालेली ही नवीन जर्सी ही जुन्या जर्सी पेक्षा थोडी वेगळी आहे.
PC - INSTAGRAM |
टीम इंडिया ची सध्याची जर्सी ही गडद निळ्या रंगाची होती. नवीन जर्सी सुद्धा त्याच रंगाची आहे पण तिचे डिझाईन हे खूप वेगळे आहे. या जर्सी च्या पुढील बाजूस आपल्याला हलक्या निळ्या रंगाच्या पट्ट्या पाहायला मिळतील. आधीच्या जर्सी मधे खांद्यावर तिरंगा असायचा पण या जर्सी ला खांद्यावर कोणतीही डिझाईन नाही.
तुम्हाला कशी वाटली टीम इंडियाची नवीन जर्सी हे कमेंट मधे नक्की सांगा.
हे वाचा.
टी-२० विश्वचषक २०२१ वेळापत्रक
0 टिप्पण्या