संतोष जगताप यांच्यावर उरुळी कांचन येथे गोळीबार | उपचारादरम्यान मृत्यू वाचा सविस्तर.

 दौंड तालुक्यातील राहू या गावातील रहिवासी आणि राहू येथे दोन युवकांच्यावर झालेल्या गोळीबारातील आरोपी व वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर उरुळी कांचन येथे एका हॉटेल समोर गोळीबार करण्यात आला. सध्या संतोष जगताप यांची परिस्थिती गंभीर होती आणि उपचारासाठी तातडीने दवाखान्यात हलवले पण उपचारादरम्यान मृत म्हणून घोषित केले.

उरुळी कांचन गोळीबार


                     🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍

                                👆👆👆👆👆


या घटनेच्या ठिकाणी पोलीस हजर झाले असून  आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. काही माहितीनुसार असे समोर येत आहे की संतोष जगताप एका प्रसिध्द हॉटेल समोरून जात असताना उरुळी कांचन येथीलच काही युवकांनी (अद्याप स्पष्ट नाही) पिस्तुला द्वारे संतोषवर हल्ला केल्याची माहिती मिळाली. संतोष जगताप यांच्या अंगरक्षकांनी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना एक जण जखमी केल्याची माहिती समोर येत आहे. 

उरुळी कांचन गोळीबार


जखमी गुंड त्यांच्यासाथीदारांसह फरार झाला असून पोलिस त्यांचा तपास करत आहे. हे वाचा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या