विकास पाटील चा फिल्म इंडस्ट्रीतील प्रवास
PC - INSTAGRAM |
विकास पाटील यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला आहे. त्यांनी आपले शालेय शिक्षण एम. एस. एस. विद्यालय आणि कॉलेज चे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे पूर्ण केले आहे. त्यांनी ग्रॅज्युएशन Bsc. Botany या विषयातून पूर्ण केले. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपले करिअर अभिनय क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतला.
नाव - विकास बाळकृष्ण पाटील.
जन्म - २४ सप्टेंबर १९८२ (पुणे)
वय - ३९ (२०२१ पर्यंत)
उंची - ५ फूट ८ इंच.
धर्म - हिंदू.
बायकोचे नाव - स्वाती पाटील
मुलाचे नाव - मौर्य
विकास पाटील यांनी आपल्या करिअर ची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. मराठी नाटकांमध्ये 'हमिदाबाईची कोठी' हे त्यांचे गाजलेले नाटक आहे. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट १९९२ मधील हमशकल हा होता. विकासने त्याचे ॲक्टर म्हणून करिअर २००९ मधे चला खेळ खेळूया दोघे या चित्रपटातून चालू केले जो की प्रमोद समेल यांनी डिरेक्ट केला होता. २०१४ मधे प्रदर्शित झालेला 'असा हा अतरंगी' मधे देखील त्यांनी भूमिका केली होती. त्यानंतर त्यांनी 'तुझ्या विन मरजावा' या चित्रपटामध्ये अनिकेत नावाची भूमिका केली होती. विकास पाटील यांनी बऱ्याच चित्रपटामध्ये काम केले त्यापैकी मालक, मराठी टायगर्स, दिशा, गोळा बेरीज, तुकाराम आणि अय्या यासारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. ' अय्या ' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.
२०१७ मध्ये प्रदर्शित झालेला ' शेंटीमेंटल ' या चित्रपटामध्ये त्यांनी आयपीएस सुभाष जाधव या नावाची भूमिका केली होती.
मराठी मालिकांमध्ये त्यांनी 'अधुरी एक कहानी' या मालिकेतून टीव्ही विश्वात पाऊल टाकले. त्याचप्रमाणे बायको अशी हवी, अंतरपाट, कुलवधू, माझीया माहेरा, स्टार प्रवाह वरील लेक माझी लाडकी आणि २०१८ मधे झी युवा वरील ' वर्तुळ ' या मालिकांमध्ये भूमिका केल्या. झी मराठी वरील ' तुझ्यात जीव रंगला ' या मालिकेमध्येही त्याने काही काळासाठी आदित्य नावाची भूमिका साकारली होती. माझ्या नवऱ्याची बायको यामधे साईप्रसाद महाजनी या नावाची भूमिका केली होती.
त्यांना सगळ्यात जास्त प्रसिध्दी ही २००१ मधे ईटीव्ही मराठी वरील चार दिवस सासूचे या मालिकेतून मिळाली. २०१६ मधे त्यांना पहिल्यांदाच लीड रोल करायची संधी मिळाली जी की स्टार प्रवाह वरील लेक माझी लाडकी मधे संकेत नावाची भूमिका होती.
विकास पाटील हा सध्या बिगबॉस मराठी सीझन ३ मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तो त्याच्या युक्त्या वापरून खूपच छान खेळत आहे.
• नक्की काय घडले होते त्याच्या मुलाविषयी जे वाचून डोळ्यात पाणी येईल?
नुकतीच विकासने त्याच्या मुलासोबत म्हणजेच मौर्य सोबत घडलेली गोष्ट त्याच्या बिगबॉस मधील मित्रांना सांगून मन हलके केले होते.
मौर्य हा ८ वर्षाचा आहे. जेव्हा तो ३ वर्षाचा होता तेव्हा सोसायटी मधे खेळताना तो पाण्याच्या टाकीत पडला आणि जवळपास ७ ते ८ मिनिट तो पाण्यामधे तसाच होता. आणि पाण्यात जास्त वेळ राहिल्यामुळे त्याच्या मेंदूला ऑक्सिजन मिळाला नाही. याचा खूप मोठा परिणाम त्याच्यावर झाला. जो की गेली ५ वर्ष त्याचा मुलगा बेडवरच आहे. त्याचा रिकवरी रेट खूपच स्लो आहे. सध्या त्याची बायको स्वाती मुलाची काळजी घेत आहे.
हे वाचा.
• कोण आहे विशाल निकम? Vishal Nikam Biography.
• Meenal Shah बद्दल माहिती.
• कोण आहे सोनाली पाटील? मराठी बिगबॉस सीजन ३ स्पर्धक
सोनाली पाटील
0 टिप्पण्या