कोण आहे विशाल निकम? जाणून घ्या त्याचा बिग बॉस पर्यंतचा प्रवास.
PC - instagram.com |
विशाल निकम हा मराठी बिगबॉस च्या तिसऱ्या पर्वात आपली छाप सोडताना पाहायला मिळत आहे. आणि विशालचा खेळही प्रेक्षकांच्या पसंतीस पुरून उरत आहे. आणि कित्येक लोकांच्या मनावरही तो राज्य करत आहे.
नाव - विशाल बाळासो निकम
जन्मतारीख - १० फेब्रुवारी १९९४
जन्म ठिकाण - सांगली, महाराष्ट्र
वय - २७ (२०२१ पर्यंत)
धर्म - हिंदू
अविवाहित
उंची - ५ फूट ८ इंच
वजन - ७२ kg
विशाल निकमचा जन्म सांगलीतल्या खानापूर येथे एका शेतकरी कुटुंबात १० फेब्रुवारी १९९४ साली झाला. त्याचे शालेय शिक्षण NSV मधे झाले आणि KW कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण झाले. सांगलीतील विता येथून भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली तर उच्च शिक्षण BG महाविद्यालयातून पूर्ण केले.
PC - instagram.com |
विशाल निकम च्या टीव्ही वरील कार्याबद्दल सांगायचं झालं तर मिथुन चित्रपटातून २०१८ मधे त्याने आपले पहिले पाऊल चित्रपट सृष्टीत टाकले. त्यानंतर स्टार प्रवाह वरील साता जन्माच्या गाठी मधे त्याची युवराज ही मध्यवर्ती भूमिका असलेली पहिली मालिका होती. धुमस या मराठी चित्रपटातही तो झळकला तसेच The Sniper या वेब सिरीज मधेही तो प्रमुख भूमिकेत होता. विशाल निकम हा आपल्याला स्टार प्रवाह वर नव्याने सुरू झालेल्या जय भवानी जय शिवाजी या ऐतीहासिक मालिकेत शिवा काशिद च्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. अतिशय रुबाबदार आणि रांगड्या व्यक्तीमत्वाच्या विशाल निकम चा कलाप्रवास आकांक्षा आणि मेहनतीच्या बळावर खूपच छान राहिला आहे. स्टार प्रवाह वरील दख्खनचा राजा जोतिबा (२०२१) या पौराणिक मालिकेतील त्याची जोतिबांची भूमिका आणि जय भवानी जय शिवाजी या मालिकेतील शिवा काशिद चे पात्र त्याच्या कारकीर्दीत मानाचा तुरा उभरणारी होती.
विशाल निकम अभिनेता नसता तर आर्मी ऑफिसर किंवा क्रिकेटर झाला असता. विशाल निकम स्वतः व्यायाम प्रशिक्षक आहे त्यामुळे सुदृढ आणि निरोगी राहणे हा त्याच्या आयष्यातील भागच आहे. तो रोज न चुकता २ तास व्यायाम करतोच करतो. जेवणात पथ्य पाळत असला तरी देखील त्याला चॉकलेट्स आणि गोड पदार्थ खायला आवडतात याशिवाय आईच्या हातचे जेवण त्याच्यासाठी प्रिय राहिलेले आहे. जेव्हा शूटिंग नसतं तेव्हा त्याला चित्रपट पाहणे, वाचन करणे, कोणताही खेळ खेळणे आणि भटकंती करणे आवडते. आणि क्रिकेट खेळणे हा विशालचा आवडता छंद आहे.
विशालच्या फॅशन वर बोलायचे झाले तर त्याला जे पेहराव परिधान केल्यावर आत्मविश्वास वाढतो आणि मनाला आनंद देतात ते त्याला परिधान करायला आवडतात. जेव्हा तो शूटिंग करत असतो तो प्रत्येक क्षण त्याच्यासाठी आनंद देणारा असतो. विशाल त्याच्या वडिलांना आयुष्यातील आदर्श व्यक्ती मानतो. स्वतः सोबत प्रामाणिक राहणे, अभ्यास, कठोर परिश्रम, कुटुंबाचा आशीर्वाद आणि देवावर श्रद्धा यावर तो खूप विश्वास ठेवतो.
कशी वाटली विशाल निकम विषयी माहिती कमेंट मधे नक्की कळवा.
हे वाचा.
मिनल शाह बरोबर घडले होते हे भयानक?
0 टिप्पण्या