रिषभ पंत ला आली थेट इंग्लंड वरून लग्नाची ऑफर | बघा कोण आहे ती?
भारताचा डावखुरा तडाखेबाज फलंदाज रिषभ पंत याला थेट इंग्लंड वरून लग्नासाठी ऑफर आली आहे. रिषभ पंत ला जगभरात खूपच प्रेम दिलं जातं त्यात महिलाही काही मागे नाहीत जरी त्या भारतातील असतील किंवा विदेशातील. रिषभ पंत ने खूपच कमी वेळात भारताच्या संघामध्ये त्याची जागा पक्की केली होती. एम एस धोनी ला आपला गुरु मानणारा रिषभ पंत यशाच्या टोकावर आहे. रिषभ पंत मधे भारताला यशाच्या शिखरावर ठेवण्याचे गुणधर्म आहेत. हे आपल्याला आयपीएल मधे दिसून आले असेलच.
दिल्ली कॅपिटल विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यानंतर इंग्लंड ची महिला क्रिकेटपटू सारा टेलर ने रिषभ पंतच्या बाबतीत तिच्या मनातील गोष्ट बोलली आहे. रिषभ पंतचे फॅन्स भारतीय महिला क्रिकेट मध्येच नाहीतर पाकिस्तान पासून इंग्लंड महिला क्रिकेट मधे आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी महिला क्रिकेटर कायनात इम्तियाज देखील पंत विषयी बोलताना म्हणाली होती की मी पंत सारख्या खेळाडू बरोबर लग्न करू इच्छिते. पंतच्या या यादीमध्ये अजून एक अतिशय सुंदर असणारी सारा टेलरचे नाव जोडले गेले आहे. सारा टेलर सध्या खूपच चर्चेत आहे कारण सारा टेलर जेवढी तिच्या फलंदाजी साठी ओळखली जाते तेवढीच ती एक सुंदर महिला क्रिकेटर म्हणून देखील ओळखले जाते.
• टी-२० विश्वचषक २०२१ वेळापत्रक
सारा टेलर भारतामधे तेव्हा प्रसिद्ध झाली होती जेव्हा २०१४ मधे तिने भारताचा कर्णधार विराट कोहली ला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्यावर कोहलीने या प्रपोज ला काहीही उत्तर दिले नव्हते. आता सारा ने विराट कोहली नंतर रिषभ पंत ला आपल्या मनातील गोष्ट बोलली आहे. नुकत्याच झालेल्या तिच्या इंटरव्ह्यू मधे ती म्हणली की मी रिषभ पंत ची फलंदाजी बघितली आहे. त्याची फलंदाजी खूपच प्रभावित करणारी आहे. आणि ज्या पद्धतीने तो खेळतो ती फलंदाजी मला खूप आवडते. युवा क्रिकेटर मधे मला रिषभ पंत खूप आवडतो आणि भविष्यात मी त्याच्यासारख्याच खेळाडू बरोबर मला लग्न करायला आवडेल असेही ती म्हणाली.
0 टिप्पण्या