काल रात्री का झाली होती व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम सुविधा बंद? Fb, Whatsapp, Insta Down?

  काल रात्री का झाली होती व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम सुविधा बंद?

Facebook, whatsapp, instagram down


जगभरात व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम सर्व्हर डाऊन झाल्याने नेटकरी हैराण झाले होते. सोमवारी ४ऑक्टोबर रात्री ९:१५ च्या सुमारास व्हॉट्सॲप वरती प्रॉब्लेम निर्माण होऊ लागला. त्यानंतर अनेक युजर आपल्याच इंटरनेट ला काही प्रोब्लेम झालाय म्हणून रिफ्रेश करू लागले. मात्र त्याच्यानंतर व्हॉट्सॲप कंपनी ने त्याच्या ट्विटर हॅण्डल वर अशी माहिती दिली की "काही कारणांमुळे फेसबुक वापरण्यास अडथळा येतोय. आम्ही यावरती काम करत असून लवकरात लवकर समस्या दुर करू. असुविधेसाठी क्षमस्व." 

Facebook, whatsapp, instagram down

Facebook, whatsapp, instagram down

Facebook, whatsapp, instagram down


मात्र काही माहितीनुसार आपल्याला कळले की हे बंद पडण्यामागे DNS प्रॉब्लेम मुळे घडल असल्याचं स्पष्ट झालंय.


DNS हा खासकरून इंटरनेट साठी वापरला जातो. याचा Long Form (Domain Name Server) असा आहे. DNS सर्व्हर ठप्प झाल्याने याचा परिणाम जगभरातील सोशल मीडिया साईटवर झाला असल्याने व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सर्व साईटस बंद पडल्या होत्या. 

आपल्याला पहाटेच्या 3:30 च्या सुमारास पुन्हा सर्व सुरळीत चालू झाल्याचे आढळले. हे वाचा.

Air India TATA कडे कशी आली?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या