Fecebook चे नाव Meta का ठेवले?
सोशल मीडिया कंपनी फेसबुक ने त्यांचे नाव बदलले आहे. हे ऐकून सगळ्यांनाच एक धक्का दिला आहे. आणि नेटकर्यांना विचारत पाडले आहे. आता फेसबुकचे नविन नाव मेटा (Meta) ठेवण्यात आले आहे. २८ ऑक्टोबर २०२१ ला ही माहीत फेसबुक चे फाउंडर मार्क झुकरबर्ग यांनी दिली.
आतापर्यंत फेसबुकला आपण एक सोशल मिडिया कंपनी म्हणून ओळखत होतो. पण आता मेटा (Meta) ही एक सोशल टेक्नॉलॉजी कंपनी असेल. फेसबुक सारखेच अनेक प्रॉडक्ट चा समावेश हा मेटा ब्रँड मधे असेल जसे की व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम वगैरे. आपले फेसबूक चे अकाऊंट हे नेहमीप्रमाणेच वापरता येईल. फक्त फेसबुकने अजून काही कंपन्या एकत्रित करून एक मोठी कंपनी उघडली आहे त्याचे नाव आहे (मेटा) Meta. फेसबुक ने Metaverse डेव्हलपमेंट साठी युरोपियन युनियन मधील १० हजार लोकांना काम देण्याचे घोषीत केले आहे.
👉 ❤️ हे वाचा आवडेल ❤️ 👈
मार्क झुकेरबर्ग एका कॉन्फरन्स मधे बोलताना म्हणाले की "आम्ही जे काही करतो त्यामधे एक मोठी कंपनी सामील करण्याची वेळ आली आहे. आता आम्ही फेसबुक चे मेटावर्स होणार आहोत. ते असेही म्हणाले की मेटावर्स हे मोबाईल चे भविष्य असेल." फेसबुक एक खास प्रॉडक्ट मेटावर्स (Metaverse) लाँच करण्याच्या तयारीत आहे.
• फेसबुक चे नाव का बदलले?
फेसबूक भलेही एका सोशल मीडिया कंपनीतून एका सोशल टेक्नॉलॉजी कंपनीत रूपांतर करत असले तरीही माहितीगार एका वेगळ्याच नजरेने बघत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की फेसबुक सध्या एका मोठ्या अडचणीत फसत आहे जसे की मागच्या काही वर्षात फेसबुक प्रायव्हसी च्या बाबतीत कमी पडत होती, हेट स्पीच ला सुद्धा बढावा देत होती त्याचबरोबर फेक न्यूज यासारख्या काही गोष्टींवर फेसबुक कारवाई करण्यात मागे पडत होती. असे आरोपही फेसबुक वर करण्यात आले होते. हीच गोष्ट पुसून टाकण्यासाठी फेसबूक मोठा बदल करत आहे.
जरी फेसबुक ने आपले नाव बदलले असले तरीही महत्वाचं म्हणजे कंपनी मधे काहीही बदल होणार नाही. याचे कारण की कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग हेच राहणार आहेत बाकी सगळे कर्मचारीही जसे होते तसेच राहणार आहेत. सध्या तरी कंपनी कोणताही बदल करण्याच्या विचारात नाही. ही फक्त एका फेसबूक वर लागलेल्या आरोपातून बाहेर येण्याची कल्पना आहे.
• मेटावर्स (Metaverse) म्हणजे काय?
Metaverse म्हणजे असे जग की जे साक्षात नाही ते आपल्याला अनुभवायला मिळेल. म्हणजेच ऑनलाईन दूनियात व्यक्ती एकमेकांना साक्षात भेटू शकतात.
• फेसबुक अकाऊंट मधे काय काय बदल होणार?
आपले फेसबूक चे अकाऊंट हे नेहमीप्रमाणेच वापरता येईल. कसलाही बदल त्यामधे होणार नाही.
हे वाचा.
0 टिप्पण्या