मराठी बिगबॉस पर्व तिसरे सुरू होताच घरातील एक सदस्य खूपच चर्चेत आली होती ती म्हणजे मिरा जगन्नाथ. मिरा चा गेम प्लॅन कोणाला आवडतोय तर कोणाला निराश देखील करतोय. चला तर मग जाणून घेऊया मिरा जगन्नाथ विषयी थोडीफार माहिती.
PC - Instagram |
नाव : मिरा जगन्नाथ
जन्मतारीख : २० ऑगस्ट १९९८
वय : २३ (२०२१पर्यंत)
जन्म ठिकाण : मुंबई , महाराष्ट्र
धर्म - हिंदू
मीराने तिचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले आहे. मिरा ने B.A Graduation पूर्ण केले आहे. मिरा ला अभिनय आणि योगा करायला खूप आवडते. मिरा जगन्नाथ येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेतून मोमो या नावाने लोकप्रिय झाली. मिरा एक एपिसोड शूट करण्यासाठी अंदाजे ३५ हजार रुपये एवढे मानधन घेते. मीराचे इंस्टाग्राम वर ७८ हजार फॉलॉवर्स आहेत. तिचा आवडता अभिनेता वरून धवन हा आहे.
PC - Instagram |
मिरा अनेक वर्षापासून मराठी इंडस्ट्री मध्ये काम करत आहे. पण मिराने झी मराठी वरील येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेत साकारलेली मोमो ची भूमिका फारच गाजली. मिरा एक प्रोफेशनल योगा शिक्षक देखील आहे. मिराने सर्वप्रथम जाडूबाई जोरात या मालिकेसाठी ऑडिशन दिले होते. तिला त्या ऑडिशन वरून माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत संध्या नावाची भुमिका मिळाली होती. मिराने सर्वप्रथम समीरा नावाची शॉर्ट फिल्म केली होती ते तीच पहिलं काम होतं. मिरासाठी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका तिच्या करीअर मध्ये कलाटणी देणारी ठरली. मिराने PNG ज्वेलर्स ची जाहिरात केली होती तिचे पोस्टर देखील लागले होते ते पोस्टर दुबई मधे देखील प्रकाशित करण्यात आले होते त्यामुळे ही गोष्ट तिच्यासाठी खूपच अभिमानास्पद होती.
मीराने २०२० मध्ये ‘इलु इलू’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी तिने ‘लाइव्ह इंडिपेंडंट’ या वेबसीरिजद्वारे डिजिटल पदार्पण केले.
PC - Instagram |
मीराने विविध आरोग्य सेवा आणि स्किनकेअर उत्पादनांसाठी मॉडेलिंग केले आहे. तिने 2018 मध्ये कपडे, दागिने, शूज इत्यादींच्या जाहिरातींचे शूटिंगही केले आहे, ती अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत 'चंदूकाका सराफ ज्वेलर्स'च्या पोस्टरवर दिसली होती.
त्याच वर्षी, तिने PNG ज्वेलर्सच्या नक्षी कलेक्शन या ज्वेलरी ब्रँडसाठी जाहिरात शूट केली होती.
२०१६ मध्ये मीराने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत संध्याच्या भूमिकेतून पदार्पण केले. २०१७ मध्ये ती एका मॅट्रिमोनी वेबसाइटच्या जाहिरातीत दिसली होती.
२०१८ मध्ये ती 'प्रेमम जयती' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.
व्हिडिओ पाहा
२०२० मध्ये, ती 'ये साजना' या मराठी गाण्यात दिसली.
व्हिडिओ पाहा
२०२१ मध्ये ती ‘शिलावती’ गाण्यातही दिसली होती.
व्हिडिओ पाहा
असा आहे मराठी बिगबॉस पर्व ३ ची स्पर्धक मिरा जगन्नाथ चा प्रवास आवडल्यास नक्की शेअर करा.
0 टिप्पण्या