आयपीएल २०२२ साठी सोमवारी २५ ऑक्टोबर ला झालेल्या दुबईमधील बीसीसीआयच्या बैठकीमध्ये दोन नवीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल च्या पुढील सीझन मधे अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन संघ आपल्याला मैदानावर खेळताना दिसणार आहेत.
PC - Instagram |
अहमदाबाद च्या संघाला सीवीसी कॅपिटल ग्रुप (Irelia Company Pte. Ltd) ने खरेदी केले आहे तर लखनऊ च्या संघाला आरपीएसजी - संजीव गोयंका यांनी घेतले आहे. बीसीसीआय ने संघाची बेस प्राइज २००० कोटी इतकी ठेवण्यात आली होती.
👉 ❤️ हे वाचा आवडेल ❤️ 👈
आरपीएसजी - संजीव गोयंका ग्रुपने लखनऊ फ्रेंचायझी ला ७,०९० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आणि सीवीसी कॅपिटल ग्रुप ने अहमदाबाद फ्रेंचायझी ला ५,६०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. बीसीसीआय ला या दोन्ही संघांकडून तब्बल १२ हजार कोटी रुपयांची कमाई झाली. ज्याची बीसीसीआयला आशा देखील नव्हती.
PC - Instagram |
दुबईमध्ये झालेल्या या ऑक्शन मधे एकूण १२ व्यावसायिक सहभागी झाले होते त्यामधे अदानी ग्रुप, टोरेंट फार्मा, हिंदुस्तान टाइम्स मिडिया ग्रुप, माजी मंत्री नवीन जिंदलचा जिंदल स्टील ग्रुप, रॉनी स्क्रूवाला, इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड चे मालक ग्लेजर परिवार हे देखील सहभागी झाले होते. पण त्यांची बोली ५००० कोटींपर्यंत सुद्धा पोहोचू शकली नाही आणि संजीव गोयंका आणि सीवीसी कॅपिटल यांनी यात बाजी मारली. यातच संजीव गोयंका यांनी आयपीएल इतिहासातील सर्वात जास्त ७,०९० कोटी रुपयांची बोली लावली.
• पुढील आयपीएल का रोमांचक होणार -
हे दोन संघ सहभागी झाल्यानंतर पुढच्या सीझन मधे संघांची एकूण संख्या १० होईल. त्याचबरोबर आयपीएल मधील सामन्यांची संख्यादेखील ६० वरून ७४ वर जाईल. खेळाडूंविषयी बोलायचे झाले तर दोन संघ वाढल्यामुळे ४५ ते ५० नवीन खेळाडूंना आयपीएल मधे खेळण्याची संधी मिळू शकते. ज्यामधे ३० ते ३५ भारतीय युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.
तुमचे याविषयी की मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा.
हे वाचा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
• आयपीएल विजेत्या संघाला किती पैसे दिले जातात?
• IPL संघ मालक, खेळाडू किती आणि कसे पैसे कमावतात?
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
0 टिप्पण्या