धोनी ने MENTOR पदाबद्दल केला मोठा खुलासा वाचा सविस्तर.

 एम एस धोनी टि-२० विश्वचषक २०२१ मध्ये टीम इंडिया मेंटोर च्या भूमिकेसाठी कोणतेही शुल्क आकारनार नाही. 


दोन वेळा विश्वचषक विजेत्या आणि सर्वात यशस्वी कर्णधाराला बीसीसीआय ने संघ निवडण्याच्या पार्श्वभूमीवर टी-२० विश्र्वचषकासाठी टीम इंडिया चे मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली होती. 

ms dhoni as mentor for t20, dhoni as mentor news....
PC - INSTAGRAM


भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी आगामी टी 20 विश्वचषक 2021 साठी भारतीय क्रिकेट संघाचे मार्गदर्शक म्हणून त्याच्या भूमिकेसाठी कोणतेही मानधन घेणार नाही, असे बीसीसीआय चे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले. विश्वचषक वेळापत्रकानुसार १७ ऑक्टोबरपासून ओमान आणि यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आगामी टी -20 विश्वचषकासाठी धोनीला मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आले आहे.  टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे असतील आणि भरत अरुण हे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून असतील. आर. श्रीधर यांना क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी दिली आहे.


बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी सांगितले की, एमएस धोनी यांनी आयसीसी टी -20 विश्वचषक या स्पर्धेत टीम इंडिया चे मार्गदर्शक ही जबाबदारी स्वीकारल्याबद्दल BCCI बोर्ड धोनीचे आभारी आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शहा म्हणाले की, धोनी त्याच्या नवीन भूमिकेसाठी एक पैसाही घेणार नाही. धोनी टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणून त्याच्या मोबदल्यात कोणतेही मानधन घेणार नाही, असे ते म्हणाले.


 ऑगस्ट २०२० मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून BCCI निवृत्ती घेतली त्याचा शेवटचा सामना २०१९ च्या विश्वचषक उपांत्य फेरीचा होता, जो संघ न्यूझीलंडकडून हरला. पण धोनीचे इंडियन प्रीमियर लीग मधे चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणे सुरूच आहे. असे मानले जाते की धोनीला त्याच्या जवळच्या परिपूर्ण पांढऱ्या चेंडूची रणनीती आखण्याच्या अनुभवासाठी मार्गदर्शक म्हणून निवड केली. त्याने नुकतेच त्याच्या फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आपल्या संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवले आहे.


महेंद्र सिंग धोनी हा एक आतापर्यंत भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आणि या यष्टीरक्षक फलंदाजाने भारताला दोन विश्व विजेतेपद मिळवून दिले जे की २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील टी -20 विश्वचषक आणि भारतात २०११ चा एकदिवसीय विश्वचषक.


एम.एस.धोनी ला संघात चांगली प्रतिष्ठा आणि आदर आहे, त्याला आणणे याचा अर्थ कोणालाही कमी करणे नाही. त्यांनी खूप अभूतपूर्व कामे देखील केली आहेत,  असे जय शाह सांगत होते.


हे वाचा.

IPL संघ मालक, खेळाडू किती आणि कसे पैसे कमावतात ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या