शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया देखील झाला होता. काही दिवसांपूर्वी घरामधे पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला इजा झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. आय.सी.यू मध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. त्या उपचारानंतरही बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीत काही सुधारणा दिसून येत नव्हती.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान (रविवार दी.१४) रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यसृष्टीवर मोठी दुःखद बातमी पसरली आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै २०२१ रोजी वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण केले होते. यानिमित्त पुण्यामधील कात्रज येथे एका कार्यक्रमाचे देखील आयोजन केलं होत. या कार्यक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते.
व्हायरल! पिझ्झा खाणाऱ्या आजीबाई | पाहा व्हिडिओ
• कोण होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ?
शिवचरित्र घराघरात पोहोचवण्यासाठी चंदनासारखे झिजलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी पुण्याजवळील सासवड या ठिकाणी झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असे आहे.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात ते इतिहास संशोधक, शिवशाहीर आणि लेखक म्हणून ओळखले जातात. पुण्यामधील भारत इतिहास संशोधक मंडळात अनेक वर्ष त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम देखील केले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी २०१५ पर्यंत १२ हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. "आग्रा,राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध,कलावंतिणीचा सज्जा, पन्हाळगड, पुरंदर, सावित्री, पुरंदर्यांचा सरकारवाडा, पुरंदर्यांची नौबत, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजर्याचे मानकरी,जाणता राजा, राजगड, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, शेलारखिंड, कलावंतिणीचा सज्जा, सिंहगडपुरंदरच्या बुरुजावरून," यांसारखे अनेक साहित्यलेखन त्यांनी केले आहे.
फेसबुकचे नाव का बदलले?
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि गडकिल्ले हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. गेली अनेक वर्षे बाबासाहेब पुरंदरे यांना शिवचरित्र महाराष्ट्राबाहेरही नेण्याचं श्रेय त्यांना दिलं जात. पण हे करताना त्यांच्यावर अनेक टीका आणि विरोधही झाला. सर्व लहानमोठ्यांनी शिवचरित्र वाचा असे ते म्हणायचे. 'राजा शिवछत्रपती' हे त्यांची प्रसिद्ध साहित्यलेखन मानले जाते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना "२०१२ मधे प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार ,२०१५ मधे महाराष्ट्रभूषण पुरस्कार , २०१६ मधे गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार" यांसारखे बरेच पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले होते.
तर अशा या मराठी माणसाला म्हणजेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
0 टिप्पण्या