1 MB ची किंमत Wi-Fi वाल्यांना कळणार नाही त्याची किंमत फक्त आणि फक्त 1.5 GB/Day मोबाईल डाटा वापरत असलेल्या लोकांनाच कळेल. त्यामुळेच या आर्टिकल मधे आपण अश्या काही Android Apps बद्दल माहिती घेणार आहे ज्याची size फक्त 1MB किंवा त्याहीपेक्षा कमी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व Android Apps कमी Data वापरतील.
१) Lockwatch - Thief Catcher
या Android App च्या नावावरूनच आपल्याला कळले असेल की या App चा उपयोग चोरांना पकडण्यासाठी केला जाईल. आपला मोबाईल कुठे हरवला किंवा चोरीला गेला तर या Android App द्वारे आपण त्या चोराला म्हणजेच ज्याने आपल्या मोबाईलचा Password खोलण्याचा प्रयत्न केला तर हे App त्याचा फोटो काढून डायरेक्ट आपल्या Email वर Send करतो. या Android App ची Size 1MB च्या आत म्हणजेच 0.92 MB इतकीच आहे.
२) Dolfin Zero Incagnito Browser -
Dolfin Zero Incagnito Browser हे Android App जे Incagnito Mode चा वापर करतात त्यांच्यासाठी खूपच उपयोगी आहे. जर तुम्हाला Crome, FireFox, Opera हे सगळे Browser आवडत नसतील आणि तुम्हाला जर खूपच कमी size आणि जो आपली कोणतीही Search History Save करत नाही तर हा Android App नक्की वापरून बघा. या Android App ची Size फक्त 463kb आहे जे की 1MB पेक्षाही कमी.
३) Draw15 -
हे Android App खूपच हलके फुलके आहे ज्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करू शकतो. या App मधे तुम्ही कोणतेही रंगीबेरंगी चित्र काढू शकता. लहान मुलांसाठी या Android App चा खूप उपयोग होऊ शकतो. आपल्या आर्टिकल प्रमाणेच हे ॲपची size देखील फक्त 154kb आहे.
४) SlimSocial -
आजकाल Facebook तर सगळेच वापरतात. आपल्याला तर माहीतच असेल की Facebook App ची Size किती आहे. जर तुमच्या मोबाइल मधे जागा कमी आहे आणि Data दिवसभर पुरत नाही तर हे Android App नक्कीच वापरून बघा. या App मधे जसा आनंद तुम्ही Facebook App मधे घेता अगदी तसाच आनंद या App मधे घेऊ शकता. या App ची Size फक्त 202 KB आहे.
५) Image Compressor Lite -
या App मधे आपण कोणत्याही फोटो ची size त्याची Quality खराब न करता कमी करू शकतो. एकदा हे ॲप वापरून बघा. या Android App ची size 1MB पेक्षा कमी म्हणजेच 0.95 KB आहे.
तर कसे वाटले 1 MB Apps जे की Play Store वर सहजरीत्या उपलब्ध आहेत.
0 टिप्पण्या