एअरटेलच्या ग्राहकांना मोठा धक्का ! प्रीपेड प्लॅन्समधे तब्बल २५ टक्क्यांनी वाढ


देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल ने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किमतीमध्ये तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. जवळपास सर्वच प्लॅन मधे वाढ करून एअरटेल ग्राहकांना धक्काच दिला आहे. त्याचे कारण असे की एअरटेल कंपनीला सध्या प्रती ग्राहकामागे २०० रुपये मिळत आहेत आणि एअरटेल ने त्यामधे बदल करून ३०० रुपये प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २६ नोव्हेंबर पासून या सर्व प्लॅन्स साठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

airtel new prepaid plans, Airtel recharge plan 2021


• कोणकोणत्या प्लॅन मधे वाढ झाली?

सध्या २८ दिवसांसाठी मिळणारा ७९ रुपयांचा प्लॅन मधे वाढ होऊन ९९ रुपयांना मिळणारा आहे. तर १४९ रू. चा प्लॅन १७९ रुपयांना, २१९ रुपयांचा प्लॅन २६५ रुपयांना, २४९ रुपयांचा प्लॅन २९९ रुपयांना, २९८ रुपयांचा प्लॅन २५९ रुपयांना, ३९९ रुपयांचा प्लॅन ४७९ रुपयांना, ४४९ रुपयांचा प्लॅन ५४९ रुपयांना, ३७९ रुपयांचा प्लॅन ४५५ रुपयांना, ५९८ रुपयांचा प्लॅन ७१९ रुपयांना, ६९८ रुपयांचा प्लॅन ८३९ रुपयांना, १४९८ रुपयांचा प्लॅन १७९९ रुपयांना आणि २४९८ रुपयांचा प्लॅन २९९९ रुपयांना मिळणार आहेत. अशी दरवाढ जवळजवळ सर्वच प्रीपेडच्या प्लॅन्स मधे झाली आहे.         

airtel new prepaid plans, Airtel recharge plan 2021
             

कोरोणा आणि महागाईच्या काळात एअरटेलने केलेल्या दरवाढीमुळे ग्राहकांना चांगलाच आर्थिक धक्का दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांनी चांगलीच निराशा दर्शविली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या