मराठी बिगबॉस सिझन ३ स्पर्धक गायत्री दातार ची लाईफस्टाईल कशी आहे, तिचा टीव्ही जगतातील प्रवास आणि तिच्या कुटुंबाविषयी सर्वकाही माहिती आपण यामधे पाहणार आहेत.
गायत्री दातार चे एका वाक्यात वर्णन करायचं म्हणलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान हेच म्हणावं लागेल. गायत्री ला आजदेखील ईशा या नावाने ओळखले जाते.
नाव - गायत्री दातार
जन्म - ३० जुलै १९९३ (मुंबई)
वय - २८ (२०२१ पर्यंत)
गायत्री दातार यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे झाला. गायत्री यांनी आपले शालेय शिक्षण मुंबई येथेच पूर्ण केले आणि ग्रॅज्युएशन हे अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट, मनाली येथून पूर्ण केले आहे. गायत्री बालपणापासूनच खूप धाडसी आणि खूप हिम्मतवान होती. तिने आजपर्यंत अनेक पर्वतरांगा, गडकिल्ले हे सर केलेले आहेत म्हणजेच तिला ट्रेकिंगची खूप अवड आहे. गायत्री ही तिच्या आई वडिलांची खूप लाडकी आहे त्यामुळे तिच्या ॲक्टींगला कधीच विरोध झाला नाही. गायत्रीला एक मोठा भाऊ देखील आहे.
• Biggboss Marathi Season 3 All Contestant Biography
• घरबसल्या हे व्यवसाय करून कमवा पैसे
गायत्री दातारला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. असेच एका नाटकात काम करत असताना गायत्री यांना सुप्रसिद्ध मराठी कलाकार सुबोध भावे यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला होता. आणि महत्वाचं म्हणजे गायत्रीने तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअर ची सुरुवात देखील २०१८ मधे सुबोध भावे यांच्यासोबत 'तुला पाहते रे ' या मालिकेतून झाली. गायत्री यांची ही पहिलीच मालिका होती आणि त्याच मालिकेमधील ईशा निमकर ची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उरली आणि त्यांना टीव्ही क्षेत्रात खूप प्रसिद्ध केले.
यानंतर गायत्रीने 'निम्मा शिम्मा राक्षस' या नाटकात काम केले. या नाटकात गायत्रीसोबत अंकुर वाडवे हेदेखील होते आणि हे एक बालनाट्य होते. तुला पाहते रे या मालिकेतून पदार्पण करण्याआधी गायत्री ने एक शॉर्ट फिल्म देखील केली होती त्याचे नाव होते 'इन टॉलरन्स' ही शॉर्ट फिल्म अजिंक्य लोखंडे यांनी दिग्दर्शित केली होती. यातील गायत्रिची भूमिका देखील प्रेक्षकांना आवडली होती. 'निम्मा शिम्मा राक्षस' या नाटकानंतर गायत्रीने काही काळ ब्रेक घेतला आणि त्यानंतर ती 'चला हवा येऊ द्या' लेडीज स्पेशल यामधे देखील आपल्याला पाहायला मिळाली. मराठी बिगबॉस सीझन ३ च्या घरात जाण्याआधी देखील गायत्री चला हवा येऊ द्या मध्येच काम करत होती.
गायत्री यांनी एक सये नावाचं म्युझिकल अल्बम साँग देखील केले आहे. गायत्रीला ट्रेकिंग ची खूप आवड आहे. ती पुण्यातील एका ट्रेकिंग ऑर्गनायझेशन ची लीडर देखील आहे. सध्या गायत्री मराठी बिगबॉस सिझन ३ च्या घरात आहे तर पाहूया आता तिचा प्रवास कुठपर्यंत जातोय.
अशा प्रकारे गायत्री दातार ने मराठी अभिनय क्षेत्रात जागा मिळवली तर कसा वाटला गायत्री दातार चा जीवनप्रवास कमेंटमधे नक्की सांगा.
0 टिप्पण्या