पुणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामधे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.
🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍
👆👆👆👆👆
भोर तालुक्यातील भांबवडे गावात एका २९ वर्षाच्या विवाहित महिलेवर गावातील दोन तरुणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडित महिलेचा पती दवाखान्यात उपचार घेत असताना आरोपींनी डाव साधला. पीडित महिला गुरे बांधण्यासाठी गोठ्यात गेली असताना आरोपी तिथे गेले. आणि आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून पीडित महिलेला गोठ्याची कडी लावून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.
हा खळबळजनक प्रकार राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पीडित महिलेने शनिवारी (दिनांक ७) फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कारासह विनयभंग आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामधे अनिल वाडकर, महेश सोनवणे राहणार भांबवडे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे वाचा.
• भारतीय वायुसेना भरती प्रक्रिया २०२१-२२
0 टिप्पण्या