भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० वर्ल्ड कप च्या सामन्यात काय काय घडले? वाचा सविस्तर India vs Afghanistan T-20 World Cup 2021 Match Highlights

भारताने दोन सामन्यात म्हणजेच पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारल्याने टी-२० वर्ल्डकप मधील आशा काही प्रमाणात संपुष्टात आल्या आहेत. परंतु भारताचा तिसरा सामना हा अफगाणिस्तान या संघाबरोबर होता. यामध्ये अफगाणिस्तान ने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजी करण्यास पाचारण केले. मात्र हा निर्णय भारतासाठी फायद्याचा ठरला कारण भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी म्हणजेच रोहित शर्मा आणि के.एल.राहुल यांनी भारतासाठी मजबूत अशी खेळी केली. 

Ind vs AFG t20,India vs Afghanistan 2021,T20 LIVEIND vs AFG Highlights, T20 World Cup 2021  India beats Afghanistan by 66 runs

भारत फलंदाजी - 

भारताने या मॅच मधे संघात एक बदल केला तो म्हणजे ईशान किशन ऐवजी पुन्हा सूर्यकुमार यादव ला संघात स्थान दिले. आणि सलामिसाठी रोहित शर्मा आणि के.एल.राहुलला मैदानात उतरवले. आणि तो निर्णय भारतासाठी फायद्याचा ठरला कारण दोघांनी १४० रनांची भक्कम अशी भागीदारी केली. 


• १५ व्या ओव्हर मधे भारताची पहिली विकेट गेली ती म्हणजे अफगाणिस्तानच्या करीम जनात ने रोहित शर्माला (४७ चेंडू ७४ रन) मोहम्मद नबी द्वारे कॅच आउट केले.

   भारत - १४० रन १ विकेट १४.४ ओव्हर

• १७ व्या ओव्हर मध्ये गुलबदिन नाईबने के.एल.राहुल ला (४८ चेंडू ६९ रन) यॉर्कर चेंडू टाकून त्रिफळा चीत केले. 

   भारत - १४७ रन २ विकेट १६.३ ओव्हर

  त्यानंतर रिषभ पंत (१३ चेंडू २७ रन) आणि हार्दिक पंड्या (१३ चेंडू ३६ रन) करून नाबाद राहिले. भारताने २० ओव्हरमधे २ विकेट गमावून २१० रन असे भक्कम आव्हान अफगाणिस्तानला दिले.

            भारत - २१०/२ ओव्हर २०


                           🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍

                                      👆👆👆👆👆


अफगानिस्तान फलंदाजी -

 अफगानिस्तान चे सलामवीर हजरतुल्लाह झाझाई आणि मोहंमद शहजाद यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी अफगानिस्तान साठी निराशाजनक सुरुवात केली. कारण


• ३ ऱ्याच ओवरमधे भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी ने शेहजादला (४ चेंडू ० रन) आर. आश्विन द्वारे कॅच आउट केले.

   अफगाणिस्तान - १३ रन १ विकेट ३ ओव्हर 

• ४ थ्याच ओवरमध्ये पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने झाजाई ला (१५ चेंडू १३ रन) शार्दुल ठाकूर व्दारे कॅच आउट केले.

  अफगाणिस्तान - १३ रन २ विकेट ३.१ ओव्हर 

• ७ व्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजाने गुरबाझ ला (१० चेंडू १९ रन) हार्दिक पंड्या द्वारे कॅच आउट केले.

  अफगाणिस्तान - ४८ रन ३ विकेट ६.५ ओव्हर  

• १० व्या ओव्हर मधे रविचंद्रन अश्विन ने गुलबदीन नाईब ला एल.बी.डब्लू आउट केले.

  अफगाणिस्तान - ५९ रन ४ विकेट ९.३ ओव्हर 

• १२ व्या ओव्हर मधे पुन्हा एकदा रविचंद्रन अश्विननेच झादरान ला त्रिफळाचीत केले.

   अफगाणिस्तान - ६९ रन ५ विकेट ११.५ ओव्हर 

• १९ व्या ओव्हर मधे मोहम्मद शमी ने दोन विकेट 

  घेतल्या त्यामधे मोहम्मद नबीला (३२ चेंडू ३५ रन) रवींद्र जडेजा द्वारे कॅच आउट केले आणि रशीद खान ला (१ चेंडू ० रन) हार्दिक पंड्या द्वारे कॅच आउट केले.

   अफगाणिस्तान - १२६ रन ७ विकेट १८.३ ओव्हर 

          अफगानिस्तान - १४४/७ ओव्हर २०

अशा प्रकारे अफगानिस्तानने २० ओव्हर मध्ये १४४ रन करून ७ विकेट गमावल्या यामधे करीम जनत (२२ चेंडू ४२ रन) आणि अश्रफ (३ चेंडू २ रन) रन करून नाबाद राहिले.

अशा प्रकारे भारताने अफगाणिस्तानवर ६६ रनांने विजय मिळवला.

हे वाचा.

• आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन कधी होणार?

• अशी पोहोचेल टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कप २०२१ सेमी फायनल मधे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या