भारत विरुद्ध नामीबिया टी-२० वर्ल्ड कप च्या सामन्यात काय काय घडले? वाचा सविस्तर | India vs Namibia T-20 World Cup 2021 Match Highlights


भारताचे टी-२० विश्वचषक २०२१ मधील सेमी फायनल मधील स्वप्न अपुरे राहिले असले तरीही भारताचा  शेवटचा सामना नामिबिया विरुद्ध झाला. यामधे भारताने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली.

ind vs namibia,ind vs namibia t20 2021 highlights


नामिबिया फलंदाजी - 

नामिबियाचे सलामीवीर स्टिफन बार्ड आणि मिचेल वान लिंगेन मैदानावर फलंदाजी साठी उतरले.

• ५ व्या ओव्हर मध्ये जसप्रीत बुमराहने मिचेल वान लिंगेनला (१५ चेंडू १४ रन) मोहम्मद शमीव्दारे कॅच आउट केले.

        नामिबिया - ३३ रन १ विकेट ४.४ ओव्हर 

• ६ व्या ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाने क्रेग विल्यम्सला (४ चेंडू ० रन) रिषभपंतद्वारे स्टम्पिंग आउट केले.

        नामिबिया - ३४ रन २ विकेट ५.३ ओव्हर 

• ८ व्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा रवींद्र जडेजाने स्टिफन बार्डला (२१ चेंडू २१ रन) L.B.W आउट केले.

         नामिबिया - ३९ रन ३ विकेट ७.४ ओव्हर 

• १० व्या ओव्हरमधे रविचंद्रन अश्विनने निकोल लोफ्टी इटोनला (५ चेंडू ५ रन) रोहित शर्मा व्दारे कॅच आउट केले.

         नामिबिया - ४७ रन ४ विकेट ९.१ ओव्हर 

• १३ व्या ओव्हरमध्ये रविचंद्रन अश्विनने गरहर्ड इरॅस्मसला (२० चेंडू १२ रन) रिषभ पंत व्दारे कॅच आउट केले.

         नामिबिया - ७२ रन ५ विकेट १२.३ ओव्हर  

• १५ व्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजाने जेजे स्मितला (९ चेंडू ९ रन) रोहित शर्मा व्दारे कॅच आउट केले.

         नामिबिया - ९३ रन ६ विकेट १५ ओव्हर  

• १६ व्या ओव्हरमधे रविचंद्रन अश्विनने झेन ग्रीनला (१ चेंडू ० रन) त्रिफळाचित केले.

         नामिबिया - ९४ रन ७ विकेट १५.४ ओव्हर 

• १९ व्या ओव्हर मधे जसप्रीत बुमराहने डेव्हिड विझे ला (२० चेंडू २१ रन) रोहित शर्माव्दारे कॅच आउट केले.

         नामिबिया - ११७ रन ८ विकेट १८.५ ओव्हर  

अशा प्रकारे नामिबिया ने भारताला २० ओव्हरमधे ८ विकेट च्या बदल्यात १३२ धावांचे लक्ष्य दिले. यामधे जान फ्रीलिंक (१५ चेंडू १५ रन) आणि रूबेन ट्रम्पलमन (६ चेंडू १३ रन) नाबाद राहिले.

             नामिबिया - १३२/८ ओव्हर २०


                         🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍

                                   👆👆👆👆👆


भारत फलंदाजी -

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के.एल.राहुल यांनी भारताला जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. 

• १० व्या ओव्हरमधे जान फ्रीलींकने रोहित शर्माला (३७ चेंडू ५६ रन) ग्रीन द्वारे कॅच आउट केले

         भारत  - ८६ रन १ विकेट ९.५ ओव्हर    

         भारत - १३६/१ ओव्हर  १५.२

अशा प्रकारे भारताने नामिबिया वर ९ विकेट ने मोठा विजय मिळवला. यामधे के.एल.राहुल (३६ चेंडू ५४ रन)

आणि सूर्यकुमार यादव (१९ चेंडू २५ रन) नाबाद राहिले. आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या