भारत विरुद्ध स्कॉटलंड टी-२० वर्ल्ड कप च्या सामन्यात काय काय घडले? वाचा सविस्तर India vs Scotland T-20 World Cup 2021 Match Highlights


भारतीय संघाच्या झालेल्या एकूण तीन लढतींपैकी दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरीही मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दिमाखदार विजय मिळवत टी-२० वर्ल्डकप मध्ये पहिला विजय प्राप्त केला. शुक्रवारी स्कॉटलंड विरुद्ध चौथा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ तयार होता.

ind vs scotland 2021,india vs scotland scorecard,india vs scotland highlights


यामधे भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि स्कॉटलंड ला फलंदाजीसाठी बोलावले. भारताने या मॅच मधे शार्दुल ठाकूरच्या ऐवजी वरुण चक्रवर्ती ला संधी दिली होती. 


स्कॉटलंड फलंदाजी -

स्कॉटलंड चे सलामीवीर जॉर्ज मुनसे आणि काईल कोत्झर मैदानावर उतरले पण ते साफ असफल ठरले कारण

• ३ ऱ्याच ओव्हर मधे जसप्रीत बुमराह ने काईल  कोत्झर ला (७ चेंडू १ रन) त्रिफळाचित केले.

       स्कॉटलंड - १३ रन १ विकेट २.३ ओव्हर 

• ६ व्या ओव्हर मध्ये मोहम्मद शमीने जॉर्ज मुनसे ला (१९ चेंडू २४ रन) हार्दिक पंड्या द्वारे कॅच आउट केले.

       स्कॉटलंड - २७ रन २ विकेट ५.२ ओव्हर 

• ७ व्या ओव्हर मध्ये रविंद्र जडेजाने रिचर्ड बेरींग्टन ला (५ चेंडू ० रन) त्रिफळाचित केले. याच ओव्हरमधे शेवटच्या चेंडूवर जडेजाने अजून एक विकेट मिळवली ती म्हणजे मॅथ्यू क्रॉसला (९ चेंडू २ रन) एल.बी.डब्लू आउट केले.

        स्कॉटलंड - २९ रन ४ विकेट ७ ओव्हर 

• १२ व्या ओव्हरमधे रवींद्र जडेजाने मिचेल लिस्कला (१२ चेंडू २१ रन) त्रिफळाचित केले.

        स्कॉटलंड - ५८ रन ५ विकेट ११.२ ओव्हर 


                          🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍

                                      👆👆👆👆👆


• १४ व्या ओव्हर मधे रविचंद्रन अश्विनने ख्रिस ग्रेवेसला (७ चेंडू १ रन) हार्दिक पंड्या द्वारे कॅच आउट केले.

         स्कॉटलंड - ६२ रन ६ विकेट १३.४ ओव्हर 

• १७ व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने कमालच केली कारण टी-२० वर्ल्ड कप २०२१ मधील पहिली हॅट्ट्रिक त्याने त्याच्या नावावर केली.

 मोहम्मद शमीने कॅलम मकलोडला (२८ चेंडू १६ रन) त्रिफळाचित केले. शमीने पुन्हा दुसऱ्याच बॉलवर पुन्हा सफ्यान शरीफला (१ चेंडू ० रन) ईशान किशन ला रन आउट केले. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा शमीने अलासदिर एवंसला (१ चेंडू ० रन) त्रिफळाचित केले आणि हॅटट्रिक नावावर केली. 

         स्कॉटलंड - ८१ रन ९ विकेट १६.३ ओव्हर 

• १८ व्या ओव्हर मधे जसप्रीत बुमराह ने मार्क वॉटला (१३ चेंडू १४ रन) त्रिफळाचित केले

        स्कॉटलंड - ८५ रन १० विकेट १७.४ ओव्हर 

अशा प्रकारे भारताने स्कॉटलंड ला १७.४ ओव्हर मध्ये ऑल आउट केले. यामधे ब्रॅडली व्हील (४ चेंडू २ रन) नाबाद राहिला.

                स्कॉटलंड - ८५/१० ओव्हर १७.४भारत फलंदाजी - 

भारताच्या डावाची सुरुवात के.एल.राहुल आणि रोहित शर्मा यांनी चांगली केली 

• ५ व्या ओव्हर मधे ब्रॅड व्हीलने रोहित शर्माला (१६ चेंडू ३० रन) एल.बी.डब्लू आउट केले.

     भारत - ७० रन १ विकेट ५ ओव्हर 

• ६ व्या ओव्हर मध्ये मार्क वॉट ने के.एल.राहुलला (१९ चेंडू ५० रन) मकलोड द्वारे कॅच आउट केले.

     भारत - ८२ रन २ विकेट ६ ओव्हर
              भारत - ८९/२ ओव्हर ६.३

अशा प्रकारे भारताने स्कॉटलंड वर सोपं विजय मिळवला. भारताने ६.३ ओव्हर मधे २ विकेट गमावून ८९ रन बनवले. यामधे विराट कोहली (२ चेंडू २ रन) आणि सूर्यकुमार यादव (२ चेंडू ६ रन) नाबाद राहिले आणि स्कॉटलंड वर मोठा विजय मिळवला.


हे वाचा.

• आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन कधी होणार? 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या