टी-२० वर्ल्ड कप २०२१ मधे टीम इंडिया ला एका पाठोपाठ पराभवाचा सामना करावा लागत आहे. या आर्टिकल मधे आपण हेच पाहणार आहोत की टीम इंडिया सेमी फायनल च्या रेस मधून बाहेर पडली आहे का अजूनही टीम इंडियाचे किती चान्स आहे.
एकीकडे काही संघ सेमीफायनलच्या दिशेने जात असताना दुसरीकडे टीम इंडिया सेमीफायनल मधे पोहोचण्यासाठी काठीच्या आधारावर आहे. कारण भारताचे पाकिस्तान आणि न्युझीलंड या संघाबरोबर दोन सामने झाले असले तरी त्यामधे एकही विजय प्राप्त करण्यात भारतीय संघ साफ असफल ठरला आहे. यामुळे टीम इंडियाचा सेमीफायनल मधे पोहोचण्याचा मार्ग खूपच कठीण झाला आहे.
• टीम इंडिया ची सद्यस्थिती -
सध्या टीम इंडिया पॉइंट्स टेबल मधे २ मॅच मधे २ पराभव झाल्यामुळे पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर नेट रनरेट ही खूपच खराब आहे.
पाकिस्तानने तीन पैकी तीन सामने जिंकून जवळजवळ सेमीफायनल मधे जागा निश्चित केली आहे. आणि दुसऱ्या स्थानासाठी अफगाणिस्तान आणि न्युझीलंड यांच्याबरोबरच टीम इंडिया पण या रेस मधे आपली जागा निश्चित करू शकते.
• अशी जाईल टीम इंडिया सेमी फायनल मधे -
टीम इंडिया चे जे काही ३ सामने राहिले आहेत त्यामधे अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया याच्याबरोबर मोठ्या फरकाने तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. जसे की जवळ पास ७० पेक्षा जास्त रनांच्या फरकाने टीम इंडिया ला जिंकावे लागेल.
फक्त या विजयावरच टीम इंडिया सेमीफायनल मधे जाऊ शकत नाही कारण अफगाणिस्तान आणि न्युझीलंड यांच्या शिल्लक मॅच वर देखील टीम इंडिया अवलंबून आहे.
जसे की अफगाणिस्तानचा जर भारताबरोबर च्या सामन्यामध्ये पराभव झाला आणि अफगाणिस्तानला न्युझीलंडचा ५०+ रनांच्या फरकाने पराभव करावा लागेल.
न्यूझीलंडला स्कॉटलंड आणि नामिबियाचा ५०+ रन च्या फरकाने पराभव करावा लागेल तेव्हाच टीम इंडिया सेमीफायनल च्या रेस मध्ये टिकून राहील.
भारताला तिन्ही मॅच मधे ७०+ धावांच्या फरकाने विजय मिळवणे कठीण आहे. कारण टीम इंडियाचा दोन मॅच मधील परफॉर्मन्स पाहून हे अशक्य वाटत आहे.
तुम्हाला काय वाटते टीम इंडिया सेमीफायनल मधे पोहोचेल का नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
0 टिप्पण्या