काही दिवसांपूर्वीच बिगबॉस मराठी सीझन ३ च्या घरात दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली ती म्हणजे नीथा शेट्टी. यांचा चेहरा काही नवखा नाही कारण अनेक मालिकांमध्ये आपल्याला नीथा शेट्टी आपल्याला पाहायला मिळाली होती.
नाव - नीथा शेट्टी
जन्म - २० जून १९८६ (कर्नाटक)
वय - ३५ (२०२१ पर्यंत)
नीथा शेट्टी यांचा जन्म कर्नाटक राज्यात २० जून १९८६ रोजी झाला. यांचे वय सध्या ३५ वर्ष आहे हे ऐकून धक्काच बसला असेल कारण त्यांचा फिटनेस आणि सुंदरता पाहून वयाचा अंदाज लावणे कठीणच आहे. नीथा यांच्या जन्मानंतर त्यांच्या आई वडीलांनी कर्नाटक सोडून मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. नीथाला वयाच्या पाचव्या वर्षापासूनच टीवी पाहताना वाटायचे की आपण देखील एक अभिनेत्री व्हावे आणि त्यांनी शेवटी ते स्वप्न पूर्ण केलच. सध्या त्यांचे सर्व कुटुंब मुंबई मध्येच राहतात.
नीथा शेट्टीने तिच्या करीअरची सुरुवात २००५ मधे बॉलिवूड मधील विनोदी चित्रपट ' नो एंट्री ' याचा मराठीत देखील रिमेक आला होता यामधे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर टीव्ही मालिकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम त्यांनी 'तुम बिन जाउ कहा' या मालिकेपासून सुरुवात केली. पण नीथा यांना स्टार प्लस वरील मालिका 'कही तो होगा' यामधून प्रसिध्दी मिळाली. या मालिकेत डॉक्टर अर्चीता हे पात्र खूप गाजले होते. त्यानंतर 'घर की लक्ष्मी - बेटिया' या मालिकेतूनही प्रसिध्दी मिळाली. यानंतर नीथाने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि एका पाठोपाठ एक मालिका करत गेली. नीथाने आजपर्यंत एकूण ३४ पेक्षा जास्त मालिकेमध्ये काम केलेले आहे. तसेच नीथा शेट्टी यांना CID आणि सावधान इंडिया या मधून देखील ओळख मिळाली आहे.
PC - INSTAGRAM |
नीथाने २०११ ते २०१७ पर्यंत CID च्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम केले आहे आणि २०१२ पासून सावधान इंडिया मधे देखील काम करत आहे. आजदेखील आपल्याला नीथा सावधान इंडिया मध्ये पाहायला मिळत आहे. नीथा हे नाव २०१९ मधे देखील चर्चेत आलं होत कारण सब टीव्ही वरील मालिका 'तेनालीरामा' मधे देखील दिसली होती. या मालिकेमध्ये त्यांनी महाराणी सुलक्षणा देवी हे पात्र साकारले होते.
🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍
👆👆👆👆👆
नीथा यांची विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे आडनाव शेट्टी असून त्या एवढं मराठी कसं बोलतात कारण त्यांचं बालपण हे मुंबईतच गेले आहे आणि त्यांनी लग्नदेखील एका मराठी मुलासोबतच केले आहे. नीथा यांनी २४ जून २००८ रोजी सचिन साळवी याच्यासोबत आपली लग्नगाठ बांधली. सचिन साळवी हे देखील एक कलाकार आहेत आणि ते म्युझिक आणि डान्स क्षेत्रात सध्या काम करत आहेत.
PC - INSTAGRAM |
नीथा यांना २०१७ साली आलेल्या स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या 'फुगे' या चित्रपटात देखील काम करण्याची संधी मिळाली. आणि नीथा यांचा मराठीमधील फुगे हा पहिला चित्रपट होता. नीताच्या करीअरला सर्वात मोठा कलाटणी देणारा क्षण म्हणजे नीथाने अल्ट बालाजी या प्लॅटफॉर्म वरील 'गंदी बात' या सिरीजमधे काम केले. त्यामुळे नीथा शेट्टी ची चर्चा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर होऊ लागली आणि याद्वारे खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर मराठी चित्रपट सृष्टीतील त्यांना दुसरा चित्रपट मिळाला ज्यामधे सिध्दार्थ जाधव देखील आहेत तो म्हणजे 'सर्व लाईन व्यस्त आहेत' यामधील देखील नीथाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.
PC - INSTAGRAM |
नीथा शेट्टी या जावेद अली यांच्या 'रंगरेझिया' या अल्बम गाण्यामध्ये देखील दिसल्या होत्या. एम टीव्ही वरील 'बिग एफ' या मालिकेचा देखील भाग होत्या.
आता पुन्हा एकदा २०२१ मधे नीथा शेट्टी-साळवी हे नाव चर्चेत आलं आहे. त्याच कारण म्हणजे मराठी बिगबॉस सिझन ३ मधे त्यांनी वाइल्ड कार्ड म्हणून एंट्री घेतलेली आहे. तर कसा वाटला नीथा शेट्टी यांचा जीवनप्रवास कमेंट मध्ये नक्की सांगा.
हे वाचा.
• आहे मीरा जगन्नाथ? बिगबॉस मराठी पर्व ३ स्पर्धक
• कोण आहे विशाल निकम? Vishal Nikam Biography.
• Meenal Shah बद्दल माहिती
• कोण आहे सोनाली पाटील?
• विकास पाटील फॅमिली, सीरियल लिस्ट | मराठी बिगबॉस सीझन ३ स्पर्धक विकास पाटील
• जय दुधाने विषयी हे फॅक्ट तुम्हाला माहित नसतील
• उत्कर्ष शिंदे लाईफस्टाईल
0 टिप्पण्या