भारतीय संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्यामुळे मायदेशी परतला असून यानंतर लगेचच न्यूझीलंड चा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेमध्ये ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
टी-२० विश्वचषकात भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यामुळे भारताचे नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांची कामगिरी आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने 16 खेळाडूंच्या संघाची निवड केली आहे. भारत 17 नोव्हेंबर 2021 पासून तीन टी-२० सामने खेळणार आहे.
🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍
👆👆👆👆👆
टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघ -
रोहीत शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेट कीपर), ईशान किशन, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज,
कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ -
अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धीमान साहा (विकेट किपर), के. एस. भारत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध्द कृष्णा.
विराट कोहली दुसऱ्या कसोटीतून संघामध्ये सामील होईल.
वेळापत्रक (Timetable) -
टी-२० सामने -
• पहिला टी-२० सामना - १७ नोव्हेंबर २०२१, जयपूर
संध्या. ७.०० वाजता
• दुसरा टी-२० सामना - १९ नोव्हेंबर २०२१, रांची
संध्या. ७.०० वाजता.
• तिसरा टी-२० सामना - २१ नोव्हेंबर२०२१,कोलकता
संध्या. ७.०० वाजता
कसोटी सामने -
• पहिला कसोटी सामना - २५ ते २९ नोव्हेंबर २०२१
कानपूर,
सकाळी ९:३० वाजता
• दुसरा कसोटी सामना - ०३ ते ०७ डिसेंबर २०२१
मुंबई,
सकाळी ९:३० वाजता
टीप - सर्व सामने भारतीय वेळेनुसार
महत्वाचे म्हणजे या भारत विरूद्ध न्यूझीलंड मालिकेसाठी निवड समितीने काही नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे यामधे आयपीएल गाजवणारा पुणेकर ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर यांना देखील संधी दिली आहे.
हे वाचा.👇👇👇👇👇
• आयपीएल २०२२ मधे हे दोन नवीन संघ दिसणार मैदानावर
• आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन कधी होणार?
0 टिप्पण्या