न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल सामना टी-२० विश्वचषक २०२१ | T-20 World Cup 2021 Final Match Highlights

 

टी-२० विश्र्वचषक स्पर्धेची फायनल मॅच न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या संघात रंगली होती यामधे ऑस्ट्रेलिया ने न्यूझीलंडवर ८ विकेटनी मात करून न्यूझीलंडचे टी-२० विश्वचषक २०२१ जिंकण्याचे स्वप्न अपुरे राहिले.

NZ vs AUS final t-20 world cup final match highlights


तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया ने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि न्यूझीलंड ला फलंदाजी साठी आमंत्रित केले होते.

आयपीएल २०२२ मधे हे दोन नवीन संघ दिसणार मैदानावर 

न्यूझीलंड फलंदाजी - 

 न्यूझीलंड चे सलामवीर मार्टिन गुपटील आणि डरील मिचेल मैदानावर फलंदाजी साठी उतरले.

• ४ थ्या ओव्हरमधे जोश हेझलवूड ने मिचेलला (८ चेंडू ११ धावा) मथ्यु वेड द्वारे कॅच आउट केले. 

        न्यूझीलंड - २८ रन १ विकेट ३.५ ओव्हर 

• १२ व्या ओव्हरमधे अडम झम्पा ने मार्टीन गुप्टिलला (३५ चेंडू २८ धावा) स्टोयनिस द्वारे कॅच आउट केले.

        न्यूझीलंड - ७६ रन २ विकेट ११.१ ओव्हर 

• १८ व्या ओव्हर मधे जोश हेझलवुडने ग्लेन फिलिप्सला (१७ चेंडू १८ धावा) ग्लेन मॅक्सवेल द्वारे कॅच आउट केले. याच ओवरमधे शेवटच्या चेंडूवर केन विल्यमसनला (४८ चेंडू ८५ धावा) स्मिथ द्वारे कॅच आउट केले. आणि विल्यमसनची तुफानी खेळी रोखली. 

        न्यूझीलंड - १४८ रन ४ विकेट १७.५ ओव्हर  

अशा प्रकारे न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला ४ विकेटच्या बदल्यात १७४ धावांचे लक्ष्य दिले. यामधे न्यूझीलंडचे जेम्स नीशम (७ चेंडू १३ धावा) आणि टीम स्वाइफर्ट (६ चेंडू ८ धावा) वर नाबाद राहिले. केन विल्यम्सनने (४८ चेंडूत ८५ धावा) तुफान खेळी केली. 

          न्यूझीलंड  - १७४/४ ओव्हर २०

ऑस्ट्रेलिया फलंदाजी - 

ऑस्ट्रेलिया चे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अरोन फिंच मैदानावर उतरले.

 • ३ ऱ्याच ओवरमधे ट्रेंट बोल्टने अरोन फिंचला (७ चेंडू ५ धावा) मिचेल द्वारे कॅच आउट केले.

      ऑस्ट्रेलिया - १५ रन १ विकेट २.३ ओव्हर  

 • १३ व्या ओव्हरमधे पुन्हा एकदा ट्रेंट बोल्टने डेव्हिड वॉर्नरला (३८ चेंडू ५३ रन) त्रिफळाचित केले.

      ऑस्ट्रेलिया - १०७ रन २ विकेट १२.२ ओव्हर   
              ऑस्ट्रेलिया - १७३/२ ओव्हर १८.५

अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८ विकेट ने विजय मिळवून टी-२० विश्वचषक २०२१ वर शिक्कामोर्तब केले. यामधे मिचेल मार्श (५० चेंडू ७७ धावा) आणि ग्लेन मॅक्सवेल (१८ चेंडू २८ धावा) नाबाद राहिले. मिचेल मार्श ला मॅन ऑफ दी मॅच आणि डेव्हिड वॉर्नर ला मॅन ऑफ दी सिरीज हे पुरस्कार मिळाले.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या