संतोष चौधरी उर्फ दादूस यांनी जेव्हा बिगबॉस मराठी सिझन ३ मधे एन्ट्री केली तेव्हा त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांना फारच उत्सुकता लागली होती. संतोष चौधरी यांनी पहिल्याच आठवड्यातील टास्क मधे आपला खेळ दाखवून अनेक प्रेक्षकांची मने जिंकली होती.
नाव - संतोष कृष्णा चौधरी (दादुस)
जन्म - १० फेब्रुवारी १९७८ (भिवंडी,ठाणे)
वय - ४३ वर्षे (२०२१ पर्यंत)
संतोष चौधरी हे गोल्डनमॅन दादुस आणि आगरी कोळीगीतांसाठी ओळखले जातात. दादुस यांनी त्यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, ठाणे आणि शारदा मंदिर हायस्कूल, कल्याण येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कॉलेजचे शिक्षण मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण केले.
PC - INSTAGRAM |
दादुस यांनी योगिता यांच्याबरोबर लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत. ज्यामधे सर्वात मोठी मुलगी हंसिका चौधरी ही एक फॅशन मॉडेल आहे. दुसरी मुलगी दीक्षा चौधरी ही शालेय शिक्षण घेत आहे आणि मुलाचे देव चौधरी हे नाव आहे.
• Biggboss Marathi Season 3 All Contestant Biography
दादूस यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. कारण त्यांचे वडील जागरण, ऑर्केस्ट्रा यांसारख्या कार्यक्रमामध्ये गायन करायचे. दादुस यांचा पहिला म्युझिक अल्बम 'कोळीगीते लोकगीते' हा होता. 'दादुस आला हळदी' हेदेखील त्यांचे खूप लोकप्रिय गाणे आहे. दादुस यांनी टीव्ही जगात 'छोटी मालकीण' या शोद्वारे पाहिले पाऊल टाकले.
PC - INSTAGRAM |
दादुस आजही अंगावर दोन ते अडीच किलो सोने परिधान करून हळदी यांसारख्या कार्यक्रमामधे स्टेजवर गाणं गाण्यासाठी उभे राहतात. दादुस यांच्याकडे फॉर्चुनर गाडी आहे त्या गाडीवर Dadus असे मोठ्या अक्षरात नाव लिहिले आहे. सध्या दादुस आपल्याला मराठी बिगबॉस मधे उत्तमरीत्या खेळताना पाहायला मिळत आहे.
असा आहे संतोष चौधरी उर्फ दादुस यांचा थोडक्यात पण अत्यंत प्रभावशाली संपूर्ण जीवनप्रवास आवडल्यास कमेंटमधे नक्की सांगा.
0 टिप्पण्या