घरबसल्या हे व्यवसाय करून कमवा पैसे | small business ideas from home


घरबसल्या व्यवसाय करून पैसे कसे कमवायचे यासाठी आज अशा small business ideas from home सांगणार आहेत की त्याद्वारे आपण घरबसल्याही काम करून पैसे कमावू शकतो. जर तुम्ही घरी बसून काम करू इच्छिता किंवा घरबसल्या आपल्याला पैसे कसे मिळतील याचा विचार करत असाल तर खालील व्यवसायांचा विचार तुम्ही करू शकता.

profitable home business ideas business ideas for women at home home business for women businesses to start from home home business ideas small business ideas from home home based business ideas business ideas for housewives


कोरोनाच्या संकटामुळे भरपूर जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर काही जणांचे व्यवसायही पूर्णतः लॉस मधे गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्येही हे काही (small business ideas from home) घरगुती व्यवसाय तुम्ही अत्यंत कमी पैशमधे चालू करू शकता.


१) घरगुती लोणची, पापड, शेवया बनवणे.

यासारखे बरेच काही खाद्यपदार्थ आहेत की ज्यांचा समावेश आपण दररोजच्या जेवणामध्ये करतो. हे पदार्थ आपण कमी खर्चात आणि घरातही सहजरीत्या बनवू शकतो. हे सर्व पदार्थ आपण आपल्या सोसायटी, कॉलनी किंवा आपल्या गावातील लोकांना सहज विकत देऊ शकतो. हा व्यवसाय खूप नफा देखील देणारा आहे आणि घरातील महिला सहज करू शकतात.

                      🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍

                                👆👆👆👆👆

२) घरगुती बेकरी - 

सध्याच्या परिस्थितीत कोणी बाहेरचे पदार्थ मागवणे किंवा खाणे टाळत आहेत. पण सर्वांच्या जीवनात काही आनंदाचे क्षण देखील येतात. जसे की वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यासारखे क्षण साजरे करण्यासाठी लागणारा केक बाहेरून मागवणे कोणी पसंद करत नाही. आणि ते सध्याच्या परिस्थितीत धोकादायक देखील आहे अशातच आपण सर्व काळजी घेऊन घरी बनवलेले चविष्ट केक आणि चॉकलेट पुरवू शकतो. आजकाल युट्यूबवर विडिओ पाहून हे सर्व काही घरी तयार करू शकता किंवा भरपूर रेसिपीजच्या वेबसाईट देखील आहेत ज्यांचे मार्गदर्शन घेऊन हे सर्व शिकू शकता.  


Fecebook चे नाव Meta का ठेवले?


३) गॅझेट रेंटिंग - 

 यामधे तुम्ही लॅपटॉप, कॉम्प्युटर, कॅमेरा यांसारख्या बऱ्याच वस्तू भाड्याने देऊ शकता. आतादेखील बरेच जण Work From Home काम करत आहेत अशावेळी ऑफिसचे काम करण्यासाठी काही जणांकडे पाहिजे ते फंक्शन असलेले लॅपटॉप, कॉम्प्युटर्स उपलब्ध नसतात. त्यांना तुमच्याकडे चांगले फंक्शन असलेले गॅझेट भाडे तत्वावर देऊ शकता. तसेच वाढदिवस यांसारख्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे असलेले कॅमेरे देखील भाड्याने देऊ शकता आणि याद्वारे छोटासा इन्कम (small business ideas from home) करू शकता.


४) मंथली मेस किंवा चटकदार पदार्थ - 

आपल्या सोसायटी मधे असे बरेच जण असतात वृद्ध व्यक्ती किंवा शिक्षणासाठी बाहेरून आलेले बॅचलर विद्यार्थी जे की स्वयंपाक करू शकत नाहीत त्यांच्यासाठी आपण जेवणासाठी मंथली मेस म्हणून जेवणाचा  डबा बनवून देऊ शकता आणि महिना भरपूर पैसे कमवू शकता. 

 

५) ऑनलाईन बिझनेस - 

भविष्यकाळ हा ऑनलाईन चा असणार आहे. कारण आतासुद्धा कोरोणाच्या काळात आपण पाहू शकता सर्व जग बंद होते पण ऑनलाईन सर्वकाही चालू होते त्यामुळे हा बिझनेस भविष्यकाळात खूप महत्वाचा ठरू शकतो. यामधे तुम्ही सर्व प्रकारचे कपडे, मेकअप साहित्य, मोबाईल ॲक्सेसरी यांसारखे विविध प्रॉडक्ट आपण विकू शकतो. यासाठी तुम्ही एक फेसबूक पेज बनवून मार्केटिंग करू शकता आणि अनेक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता.  

या सर्व व्यवसायांचे आपण व्हॉट्सॲप, फेसबूक यांसारख्या अनेक सोशल मीडिया मार्फत जाहिरात करू शकता आणि भरपूर प्रमाणात ग्राहक मिळवू शकतो. तर कसे वाटले (small business ideas from home) घरगुती व्यवसाय कमेंटमधे नक्की सांगा. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या