उत्कर्ष शिंदे हे एक लोकप्रिय गायक आहे. पण सध्या उत्कर्ष शिंदे हे बिगबॉस मराठी सीझन ३ मध्ये स्पर्धक म्हणून पाहायला मिळत आहे. बिगबॉस च्या घरात आत्तापर्यंत उत्तमरीत्या उत्कर्ष आपला खेळ दाखवत आहे.
नाव - उत्कर्ष आनंद शिंदे
जन्म - ११ जानेवारी १९८६ (मुंबई)
वय - ३५ (२०२१ पर्यंत)
उत्कर्ष शिंदे यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरात झाला. उत्कर्ष यांचे मूळ गाव पुण्याजवळील पिंपरी चिंचवड हे आहे. उत्कर्ष शिंदे यांचे शालेय शिक्षण एम. टी. एस खालसा हाईस्कूल गोरेगाव मुंबई येथे पूर्ण केले. त्यांनी आपले डॉक्टर चे शिक्षण हे पद्मश्री Dr. DY Patil College पिंपरी, पुणे येथे पूर्ण केले. तसेच पुढील शिक्षण त्यांनी लंडन आणि व्हर्जिनिया (USA) येथून पूर्ण केले. ते अतिउच्च शिक्षित असून त्यांनी B.H.M.S (Batchelor of Homoeopathic Medical & Sergery) ही डिग्री पुणे येथून घेतली आहे. उत्कर्ष हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे सदस्य देखील आहेत.
PC - INSTAGRAM |
आपल्याला माहीतच असेल की उत्कर्ष यांचे शिंदे शाही घराणे किती लोकप्रिय आहे. उत्कर्ष यांच्या आजोबांचे नाव स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे हे आहे. प्रल्हाद शिंदे यांची भक्तिगीते आजही तेवढ्याच आनंदाने ऐकली जातात. उत्कर्ष यांच्या वडिलांना तर संपूर्ण महाराष्ट्रच ओळखतो ते म्हणजे आनंद शिंदे. उत्कर्ष यांच्या आईचे नाव विजया शिंदे हे आहे आणि त्या गृहिणी आहेत. उत्कर्ष शिंदे यांना दोन भाऊ देखील आहेत त्यापैकी आदर्श शिंदे हे एक प्रसिद्ध गायक आहेत आणि हर्षद शिंदे सध्या बिझनेस सांभाळतात. उत्कर्ष शिंदे हे विवाहित असून त्यांनी डॉ. स्वप्नजा नरवाडे/शिंदे यांच्याबरोबर २०१६ मधे विवाह केला.
उत्कर्ष यांच्याकडे ऑडी ए८ आणि टाटा नेक्सन या दोन कार आहेत. उत्कर्ष हे प्राणीमित्र सुध्दा त्यांना प्राण्यांचा खूप लगाव आहे. उत्कर्ष यांनी आजपर्यंत खूप गाणी गायली आहेत. त्यापैकी भिमजयंती १२५, गणपतीची गीते, भीमा तू ये पुन्हा, भिमजी का दिवाना, भीमाची पोरं आली मैदानात, मला कोविड योद्धा म्हणा, तू गं लावून निघाली लिपस्टिक, तुजविण प्रिये मी आणि आई आहे स्वर्ग बाबा आहेत दरवाजा ही उत्कर्ष शिंदे यांची अत्यंत गाजलेली गाणी आहेत.
🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍
👆👆👆👆👆
मराठी चित्रपट "प्रियतमा" मधे २०१४ साली त्यांनी प्रथमच त्यांचा मोठा भाऊ आदर्श शिंदे यांच्यासोबत गाणं गायलं होतं. उत्कर्ष शिंदे २०१५ साली 'विजयानंद म्यूझिक प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचे डायरेक्टर झाले होते. ही कंपनी त्यांच्या शिंदे परिवाराने स्थापन केलेली आहे. उत्कर्ष शिंदे यांनी "पॉवर आणि फुंकर" या चित्रपटासाठी म्यूझिक तयार केले आहे. २०१५ मध्ये उत्कर्ष यांना "अतुल्यगौरव सन्मान" हा पुरस्कार देण्यात आला होता.
उत्कर्ष शिंदे हे त्यांचा वाढदिवस एक वेगळ्याच प्रकारे साजरा करतात जे पाहून आपल्यालाही अभिमान वाटेल. ते आपला वाढदिवस अंध आणि अनाथ मुलांसोबत साजरा करतात. त्या मुलांना भरपूर चांगले जेवण आणि कपडे देतात. उत्कर्ष शिंदे हे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी या ट्रस्टतर्फे कोरोना काळात असंख्य मदतकार्य केले होते. त्यांच्याकडे जे काही वादक होते त्यांनादेखील मदत केली होती.
तर कसा वाटला तुम्हाला मल्टीटेलेंटेड डॉ. उत्कर्ष शिंदे यांचा जीवनप्रवास कॉमेंट मध्ये नक्की सांगा.
हे वाचा.
• आहे मीरा जगन्नाथ? बिगबॉस मराठी पर्व ३ स्पर्धक
• कोण आहे विशाल निकम? Vishal Nikam Biography.
• Meenal Shah बद्दल माहिती
• कोण आहे सोनाली पाटील?
• विकास पाटील फॅमिली, सीरियल लिस्ट | मराठी बिगबॉस सीझन ३ स्पर्धक विकास पाटील
• जय दुधाने विषयी हे फॅक्ट तुम्हाला माहित नसतील
0 टिप्पण्या