IPL संघ मालक, खेळाडू किती आणि कसे पैसे कमावतात ? IPL business model case study

 IPL संघ मालक, खेळाडू किती आणि कसे पैसे कमावतात ? 

आईपीएल टीम के मालिक को क्या फायदा होता है? आईपीएल खिलाड़ी को कितना पैसा मिलता है? आईपीएल ट्रॉफी की कीमत कितनी होती है how much ipl team owners earn money ipl team owner income per match ipl franchise cost
PC - cricketaddictor.com


आयपीएल चे आगमन पुन्हा एकदा झाले आहे. प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की आयपीएल मधून सर्वात जास्त कमाई कोण करते आणि किती करते? त्यामुळे आयपीएल मधे सहभागी असलेले सर्व लोक, खेळाडू, संघमालक, फ्रेंचाईजी, बीसीसीआय आणि मीडिया पार्टनर हे सर्वच जण भरपूर पैसे कमावतात. पण सर्वात आधी कोण कमावते. हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा. 

तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की


 • बीसीसीआय आयपीएल मधून किती पैसे कमावते ?

 मीडिया पार्टनर द्वारे बीसीसीआय ची कमाई सर्वात जास्त होत असते. जेव्हा आयपीएल २००८ मध्ये सर्वप्रथम सुरू झाली होती तेव्हापासून २०१८ पर्यंत सेट मॅक्स या चॅनलने आयपीएल सोबत ८२०० कोटीचा करार केला होता. आयपीएल लाइव्ह १० वर्षासाठी सेट मॅक्स वर दाखवली जाईल. म्हणजेच १ वर्षासाठी जवळ जवळ ८२० कोटी त्यांनी दिले होते. आणि २०१८ च्या अखेरीस स्टार स्पोर्टस ने बीसीसीआय कडून पुढील पाच वर्षासाठी म्हणजेच २०२३ पर्यंत आयपीएल चे मिडिया अधिकार विकत घेतले. जिथे पूर्वी बीसीसीआय ला १ वर्षासाठी ८२० कोटी मिळत असत आता तेच ३२०० कोटी इतके मिळतात. यामुळेच बीसीसीआय चा नफाही खूप वाढला. 

आणि सर्व संघमालक किंवा फ्रेंचाईजी जे आयपीएल मधून पैसे कमावतात त्यांना त्यांच्यापैकी २० टक्के बीसीसीआय ला द्यावे लागतात. बीसीसीआय देखील येथून चांगली कमाई करते.  • टाईटल स्पॉन्सर कडून आयपीएल ची कमाई कशी    
   होते?

How much earn ipl teams, ipl madhe kiti paise kamavtat, खेळाडू आयपीएल मधून किती पैसे कमावतात, आयपीएल कमाई


 हे आयपीएल चे सर्वात मोठे प्रायोजक असतात. २००८ मध्ये DLF ने बीसीसीआय बरोबर २०० कोटीमधे करार केला होता. म्हणजेच आयपीएल समोर फक्त हे तीन शब्द लिहिण्यासाठी DLF ने बीसीसीआयला पाच वर्षासाठी २०० कोटी इतके रुपये दिले होते. त्यानंतर Pepsi ने बीसीसीआय बरोबर पुढील तीन वर्षांसाठी २४० कोटींचा करार केला होता. त्यानंतर शीर्षक प्रायोजकाची जागा Vivo ने घेतली. प्रथम Vivo ने २०१६ आणि २०१७ साठी ९५ कोटींचा २ वर्षांसाठी करार केला होता. पण त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी Vivo ने आणखी १ करार केला. तो म्हणजे वर्षाला ४४० कोटी म्हणजेच ५ वर्षासाठी २२०० कोटी  इतके रुपये त्यांनी दिले. पण २०२० मध्ये भारत चीन वादामुळे Vivo ला शीर्षक प्रायोजकातून वगळण्यात आले  आणि आत्ता Dream11 ने त्याची जागा घेतली आहे. Dream11 ने २०२० च्या शीर्षक प्रायोजकासाठी बीसीसीआय ला २२० कोटी इतकी रक्कम दिली होती.  • आयपीएल स्पॉन्सर कडून कशा प्रकारे 
    कमाई करतात?

 शीर्षक प्रायोजका व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे प्रायोजक आहेत. जसे की Jio, PayTM, Oppo, Tata, Maruti Suzuki, Kingfisher, Swiggy आणि बरेच काही. तुमच्या लक्षात आले असेलच की खेळाडूच्या जर्सी या प्रायोजकाच्या नावानेच भरलेल्या असतात. आणि क्रिकेटच्या मैदानावर देखीलही प्रायोजकाची नावे लावलेली असतात. त्यामुळे हे सर्व ब्रँड संघमालकाना भरपूर पैसे देतात. आणि त्यानंतर या ब्रँड क्या जाहिराती आपल्याला सामन्या दरम्यान दाखवल्या जातात. या सर्व ब्रँड चे मीडिया पार्टनर  म्हणजेच ज्यांनी आयपीएल चे सर्व अधिकार विकत घेतले आहेत त्यांना टीव्ही सेट मॅक्स वर किंवा स्टार स्पोर्टस वर दाखवण्यासाठी हे ब्रँड त्यांना पैसे देतात. या जाहिराती दाखवण्यासाठी त्यांनी गुंतवलेले सर्व पैसे वसूल करतात आणि नफा देखील मिळवतात. म्हणजेच सगळेचजण आयपीएल मधून पैसे कमावत आहेत. • संघमालक आणि फ्रेंचाईजी आयपीएल मधून कशा प्रकारे कमाई करतात?

 Board of Control for Cricket in India (बीसीसीआय) ही एक None Profit Organization आहे. आणि आपल्या कमाईचा ४० टक्के हिस्सा अनेक संघांना वितरीत करते. जर बीसीसीआय ५ वर्षासाठी २० हजार कोटी इतके कमावत असेल तर १ वर्षाची कमाई सुमारे ४ हजार कोटी इतकी असते आणि त्यातील ४० टक्के ८ संघांना दिली जाते. म्हणजेच १६०० कोटी म्हणजेच त्यापैकी एका संघाला २०० कोटी मिळतात. संघाचे मालक आणि फ्रेंचाईजी येथूनच भरपूर पैसे कमावतात. आणि आयपीएल खेळाडूचे वेतन देखील येथूनच कमावले जाते. मग बीसीसीआय प्रत्येक संघ मालकाला ८० कोटी इतके पैसे देते जेणेकरून ते खेळाडू खरेदी करू शकतील. म्हणून अनेक खेळाडू हे दरवर्षी संघ बदलतच राहतात. प्रत्येक 

फ्रेंचाईजी किंवा संघ मालक आपला संघ सर्वोत्तम निवडण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून संघ अनेक सामने जिंकू शकेल आणि अनेक ब्रँड त्यांना प्रायोजित करेल ज्यामुळे त्यांना अधिक कमाई होते.  • क्रिकेट मैदानावरून कशा प्रकारे कमाई केली जाते?

 ईडन गार्डन किंवा वानखेडे वर सामना चालू असेल तर संघ मालकांना एकाच सामन्यातून ६ ते ७ कोटी इतके रुपये मिळतात. त्यामुळे जे लोक तिथे येतात आणि सामना बघतात. समजा ५ हजार लोक तिथे आले आहेत आणि जर तिकीटाची किंमत ८०० ते १००० रुपये इतकी असेल तर ५ कोटी फक्त तिकिटाच्या किंमतीवरुनच उपलब्ध होतात. आणि ज्यांना टीव्ही वर जाहिरात दाखवण्यासाठी परवडत नाही ते त्यांचे बॅनर हे मैदानावर लावतात जे की त्यासाठी ते १ ते २ कोटी संघमालक किंवा फ्रेंचाईजी ला देतात. त्यानंतर जेव्हा एखादा संघ अंतिम किंवा उपांत्य फेरी जिंकतो तर जे काही विनिंग प्राइज असते त्यापैकी ५० टक्के हे संघमालकाला म्हणजेच फ्रेंचाईजी ला दिले जाते. • आयपीएल खेळाडूंची कमाई कशी होते ?

आयपीएल खेळाडूंचा पगार हा सर्वाधिक आहे असे सर्वांना वाटते पण तसे नाही. खेळाडूंनी बीसीसीआय सोबत करार केलेला असतो. तिथून त्यांना पैसे मिळतात. मग जर खेळाडू खेळत असो वा नसो. म्हणजे आयपीएल च्या सर्व सामन्यामध्ये तो जर संघाबरोबर राहिला तर मग त्याला पैसे हे मिळतातच. मग खेळाडूंना प्रत्येक सामना खेळण्यासाठी मोबदला दिला जातो. जर एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो म्हणजेच सामनावीर बनतो अधिक धावा करतो किंवा विकेट्स घेतो तर त्याला सामना संपल्यानंतर अनेक बक्षीसे देखील दिली जातात. यातूनच खेळाडूंची कमाई होते. तसेच जर एखादा संघ जर अंतिम फेरी जिंकला तर जिंकलेल्या किंमतीच्या ५० टक्के संघाच्या फ्रेंचाईजी ला दिले जाते. परंतु उर्वरित ५० टक्के हे खेळाडूंमध्ये विभागले जाणे आवश्यक आहे. जर फ्रेंचाईजी किंवा संघमालकांना हवे असेल तर संपूर्ण विजेत्याचे बक्षीस हे ते खेळाडूंमध्ये वाटू शकतात. खेळाडू येथूनही चांगले पैसे कमावतात. बीसीसआय फ्रेंचाईजी पासून खेळाडूंना खूप कमाई होते कारण जेव्हा बीसीसीआय फ्रेंचाईजी संघमालकांना निधी देते म्हणजेच ८० कोटी ज्यातून ते खेळाडू खरेदी करू शकतात. त्यामुळेच खेळाडूंनाही पैसे मिळतात. जर एखाद्या खेळाडूने आपला संघ बदलला किंवा फ्रेंचाईजी ने त्या खेळाडूला कायम ठेवले तरच. तसेच खेळाडूच्या परफॉर्मन्स वरून सुद्धा खेळाडू भरपूर कमावतात. जर एखाद्या खेळाडूने संपूर्ण सीझन मधे चांगली कामगिरी केली तर बरेच ब्रँड त्याला पाहतात ज्यामुळे खेळाडूंना बरेच जाहिराती करण्याची संधी देखील मिळते. त्यातुन सुद्धा आयपीएल चे खेळाडू भरपूर कमाई करतात.


तर मित्रांनो यामधून तुम्हाला कळले असेलच की हे सर्वजण किती पैसे कमावतात. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर शेअर करा. 


धन्यवाद 🙏


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या