कठीण काळात मनाला शांत ठेवण्याचे काही मार्ग


जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट काळ येतो तेव्हा आपले मन अत्यंत अशांत होते काय करावे? कुठे जावे? काही सुचत नाही. अशा वेळी अनेक व्यक्ती व्यसनाधीन होतात आणि आपले आयुष्य बरबाद करून घेतात. त्यामुळे या लेखामध्ये आपण वाईट काळात मनाला शांत ठेवण्याचे काही मार्ग सांगितले आहे ज्याचा वापर करून तुम्ही आपले मन शांत ठेऊ शकता. 

कठीण काळात मनाला शांत ठेवण्याचे काही मार्ग


१. अशा व्यक्तीबरोबर जाऊन बोला ज्याच्यावर तुमचा १००% विश्वास आहे. 

 प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा काही व्यक्ती असतात ज्या खूप खास असतात. आपला त्या व्यक्तींवर १००% विश्वास असतो की ही व्यक्ती नेहमी माझी साथ देईल, माझ्या भल्याचा विचार करतील. वाईट काळात अशा व्यक्तींबरोबर जाऊन बोला ही अपेक्षा करू नका की ती व्यक्ती समस्या सोडवेल. फक्त त्यांच्यासमोर आपले मन मोकळे करा. जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट काळ येतो तेव्हा आपल्या मनात एक विचार सतत येत असतो की मी एकटा आहे. त्यामुळे आपल्या मनात असूरक्षितता निर्माण होते. पण जेव्हा तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीकडे आपले मन मोकळे करता तेव्हा तुमचे मन शांत होते. तुम्हाला एक भक्कम आधार मिळतो की आपल्या पाठीशी कोणीतरी उभ आहे. या विचाराने मनातली नकारात्मकता कमी होते.  


२. ही वेळ सुद्धा निघून जाईल.

एक गोष्ट मनात कोरून ठेवली पाहिजे की या जगात सर्वकाही तात्पुरते आहे म्हणजेच आपले शरीर सुद्धा. आपल्या आयुष्यात कितीही वाईट वेळ येऊद्या संकटे, समस्या येऊद्या ती काही कायस्वरुपी राहत नाहीत जसजसा वेळ जातो तसतसे सर्व काही सुरळीत होते. तुम्हीच विचार करा की ५/१० वर्षापूर्वी तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या होत्या त्या आज आहेत का जवळपास सर्वच लोकांचे उत्तर हे नाही म्हणून असेल कारण वेळ ही सर्वकाही भरून काढते. त्यामुळे आपल्या आयुष्यात कितीही वाईट काळ असूद्या स्वतःला समजावून सांगा की ही वेळ सुद्धा निघून जाईल.  


३. ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नाही त्या गोष्टींचा जास्त विचार करू नका.

अनेक वेळी आपले मन अशांत होण्याचे कारण हे असते की आपण त्या गोष्टींचा जास्त विचार करतो ज्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत. जसे की तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जाता आणि जोराचा पाऊस सुरू होतो किंवा आपल्या मोबाईल ची बॅटरी संपते आणि तेव्हाच लाईट जाते. लक्षात ठेवा की या जगात तुमच्या दोनच गोष्टींवर नियंत्रण राहते त्या म्हणजे तुमचे विचार आणि कृती. जर नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींमुळे तुमचे मन अशांत होत असेल तर अशा वेळेस त्या परिस्थिती कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे हेच आपल्या हातात असते किंवा परिस्थितीचा स्वीकार करणे जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीचा स्वीकार करत नाही तोपर्यंत तुमचे मन अशांत असते. एकदा तुम्ही स्वीकार केला तर तुमचे मन शांत होते.  


४. लोकं काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका. 

आजकाल आपण स्वतःच सोडून लोक काय म्हणतील याचा विचार करत जास्त टेन्शन घेत असतो. या जगात कोणाकडे एवढा वेळ नाही की ते तुमचा विचार करत बसतील. प्रत्येकाला आपल्या समस्या टेन्शन आहेत. पण निष्कारण लोक काय म्हणतील हा विचार करून आपण आपले मन अशांत करत असतो. हिंदी मधे एक म्हण आहे की 'सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग' त्यामुळे लोकांचा विचार करणे बंद करा मन आपोआप शांत होईल.  


५. तुमच्या मित्राला काय सल्ला द्याल? 

जेव्हा आपले मन अशांत असते तेव्हा आपण सैरभैर होतो. आपण नक्की काय करतोय हे सुचत नाही. आपण स्वतःला कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही.  

अशा वेळेस तुम्ही एका कागदावर ज्या ज्या समस्या आहेत त्या लिहून काढा. आता असे गृहीत धरा की ज्या समस्या तुम्ही कागदावर लिहिल्या आहेत त्या तुमच्या मित्राच्या आहेत तर त्या समस्यांना तुम्ही काय उपाय शोधाल. त्या समस्या आपल्या नाहीत तर मित्राच्या आहेत या विचाराने आपले मन शांत होते आणि त्या सर्व समस्यांचे उत्तर देखील आपल्याला मिळून जाते. 


हे ते पाच मार्ग आहेत जे कठीण काळात तुमचे मन शांत करू शकतात. तुम्हाला कोणता मार्ग जास्त आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या