पावनखिंड चित्रपटाला अद्भुत प्रतिसाद | Download Pavankhind Full Hd Movie |

 पावनखिंड चित्रपटाची यशोगाथा  

तानाजीच्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपट सृष्टीत मराठा इतिहासावर आधारित चित्रपटांची लाट उसळली आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता येणाऱ्या वर्षात आपल्याला अनेक ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

Pavankhind in marathi  pawankhind movie download 720p pawankhind full movie download pawankhind marathi movie download  पावनखिंड पावनखिंडीतील लढाई Pawankhind trailer


बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांवर आधारित शौर्यगाथा आपल्याला " पावनखिंड " या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या चित्रपटाची सगळेच जन वाट पाहत होते तो चित्रपट 18 फेब्रुवारी ला प्रदर्शित झाला. ज्याचं नाव आहे "पावनखिंड" या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक दिगपाल लांजेकर हे आहेत. जे की छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एकूण ८ चित्रपट घेऊन येणार आहेत. त्याच आठ चित्रपटांमधील पावनखिंड हा तिसरा चित्रपट आहे. त्यामधे पहिले दोन चित्रपट म्हणजे फर्जंद आणि फतेशिकस्त. पावनखिंड हा चित्रपट एकूण २ तास ३३ मिनिटांचा आहे. 


या चित्रपटाची प्रसिद्धी पाहून कोणत्याही मराठी माणसाचे मन आनंदी होईलच. पावनखिंड या शब्दातच एवढी ताकद आहे की यामधे त्याग, तपस्या, निष्ठा, शौर्य, पराक्रम, बलिदान या सर्व शब्दांचा समावेश होतो.

महत्वाची गोष्ट म्हणजे अजय पुरकर यांनी जी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे ती फारच कौतुकास्पद आहे. चित्रपट पाहताना असे वाटते की आपण साक्षात बाजीप्रभू देशपांडे यांनाच पाहतोय. त्याचबरोबर मृणाल कुलकर्णी यांनी देखील मासाहेब जिजाऊंची भूमिका खूपच छान रीतीने साकारली आहे. जवळपास सर्वच प्रेक्षक असे म्हणतात की मृणाल कुलकर्णी पेक्षा ही भूमिका कोणी सुरळीत पार पाडली नसती. चित्रपटाच्या शेवटी तर अनेकांना अश्रू आवरले सुद्धा नाहीत असा जबरदस्त चित्रपट आहे. हा चित्रपट सर्वांनीच अवश्य बघितला पाहिजे. जर तुम्हाला मराठी भाषा समजत नसेल तरीदेखील हा चित्रपट तुम्ही पाहू शकता कारण या चित्रपटाला इंग्लिश उपशीर्षक देखील दिले आहेत. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला UA सर्टिफिकेट देखील दिले आहे. या चित्रपटात कसलाही अश्लील सिन नाही त्यामुळे हा चित्रपट संपूर्ण परिवारासोबत पाहण्यास कसलीही अडचण नाही.

पावनखिंड हा २०२२ मधील दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. आणि A A Films च्या संयुक्त विद्यमाने Almonds Creations च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. मराठा योद्धा, बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी यांच्यासह अंकित मोहन, प्राजक्ता माळी आणि क्षिती जोग सहाय्यक भूमिकेत आहेत.


दिग्दर्शक - दिग्पाल लांजेकर 

लेखक - दिग्पाल लांजेकर 

निर्माता - अजय आरेकर,भाऊसाहेब आरेकर, अनिरुद्ध आरेकर

भुमिका - चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, रुची सवर्ण, प्राजक्ता माळी

छायांकन - अमोल गोळे

संपादक - परमोद कहार

संगीत - देवदत्त मनीषा बाजी

कंपनी - आलमंड क्रिएशन्स, एए फिल्म्स

रिलीज डेट - १८ फेब्रुवारी २०२२

देश - भारत

भाषा - मराठी

डिसेंबर 2019 मध्ये फर्जंद आणि फत्तेशिकस्त नंतर, दिग्पाल लांजेकर यांनी 'जंग जौहर' या नवीन चित्रपटाची घोषणा केली, जो त्यांचा मराठा इतिहासातील योद्ध्यांवरचा तिसरा चित्रपट होता.

           Download Pavankhind Movie 2022 HD

पावनखिंड चित्रपटाचे चित्रीकरण कोठे झाले ? 

११ फेब्रुवारी २०२० रोजी, महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर मुख्य छायाचित्रण झाले.१९ मार्च २०२१ रोजी चित्रीकरण पूर्ण झाले. फेब्रुवारी 2021 मध्ये निर्मात्यांनी जंगजौहरचे नाव बदलून पावनखिंड हे ठेवले.

चित्रपटाचा साउंडट्रॅक देवदत्त मनीषा बाजी यांनी संगीतबद्ध केला असून दिग्पाल लांजेकर यांनी गीते लिहिली आहेत. हरिदास शिंदे, अवधूत गांधी यांनी गायलेल्या "युगत मंडळी" या ट्रॅकचा व्हिडिओ डिसेंबर २०२१ मध्ये रिलीज झाला.

पावनखिंड (पहिली रिलीज तारीख १० जून २०२१), (दुसरी रिलीज तारीख ३१ डिसेंबर २०२१ रोजी रिलीज होणार होती) SARS-CoV-2 Omicron प्रकारामुळे वाढलेल्या COVID-19 च्या लाटेमुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला. चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला. आणि या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात तब्बल ६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 

हे वाचा.👇👇👇👇

• कठीण काळात मनाला शांत ठेवण्याचे काही मार्गटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या