Biggboss Marathi हा एक कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय रियालिटी शो आहे. बिगबॉस मराठी आपल्या यशस्वीरित्या पार पडलेल्या तीन सीझन नंतर आता चौथा सीझन घेऊन येण्यासाठी सज्ज झालेला आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून याचीच वाट पाहत आहेत.
या मराठमोळ्या शोने एप्रिल २०१८ मध्ये कलर्स मराठीवर आपला पहिला सीझन प्रसारित केला होता आणि मेघा धाडेला विजेता म्हणून घोषित केले. त्यावेळी बिगबॉस मराठी चा पूर्ण सेटअप हा पुण्याजवळील लोणावळा येथे उभारण्यात आला होता.
त्यानंतर दोन अतिरिक्त सीझन प्रसारित करण्यात आले आणि अनुक्रमे सीझन २ आणि ३ चा विजेता शिव ठाकरे आणि विशाल निकम यांना घोषित करण्यात आले. सीझन 2 आणि 3 साठी बिगबॉस हाऊस चा मुंबईत सेटअप उभारण्यात आला होता.
मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंददायी बातमी आहे की हा शो आणखी एक आकर्षक सीझन घेउन येण्यासाठी सज्ज झाला आहे आणि गेल्या दोन सीझनप्रमाणे या वर्षीही मुंबईत बिगबॉस हाऊस चा सेटअप उभारण्यात आला आहे.
बिगबॉस मराठी सीझन ४ होस्ट -
हा शो 2018 मध्ये सुरू झाल्यापासून, प्रसिद्ध बॉलीवूड आणि मराठी अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे संचालन करत आहेत आणि यावर्षीही तेच या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत.
बिगबॉस मराठी सीझन ४ चे प्रक्षेपण मागील प्रत्येक सीझनप्रमाणेच रविवार, २ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ७ वाजता वायाकॉम १८ द्वारे लोकप्रिय मराठी वाहिनी कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्म Voot वर पाहायला मिळणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला Voot या ॲप वर बिल्कुल फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे.
Biggboss Marathi Season 4 चा टीझर नुकताच आपल्याला यूट्यूब वर पाहायला मिळाला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीच्या सीझन चे घोषवाक्य " All is Well " हे आहे.
• केव्हा आणि कोठे पाहता येईल ?
२ ऑक्टोबर २०२२ सं. ७ वा.
सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता
शनिवार, रविवार रात्री ९:३० वाजता
चॅनल - कलर्स मराठी
Voot App वर कधीही
बिग बॉस मराठी सीजन ४ चा प्रोमो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
• बिग बॉस मराठी सीजन ४ मध्ये जाणाऱ्या कलाकारांची संभाव्य यादी -
तेजस्विनी लोणारी
प्रसाद जवादे
अमृता धोंगडे
निखिल राजेशिर्के
किरण माने
समृध्दी जाधव
अक्षय केळकर
अपूर्वा नेमळेकर
योगेश जाधव
अमृता देशमुख
यशश्री मसुरकर
विकास सावंत
मेघा घाडगे
त्रिशूल मराठे
रुचिरा जाधव
रोहित शिंदे
टीप - वरील सर्व नावे सोशल मीडिया मार्फत कळलेली आहेत म्हणजे संभाव्य यादी आहे.
0 टिप्पण्या