कलर्स टीव्हीचा लोकप्रिय स्टंट टेलिव्हिजन रिअॅलिटी शो फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी सीझन 12 चा ग्रँड फिनाले आत्ताच वीकेंडमध्ये प्रसारित झाला. या सीझनची सुरुवात 2 जुलै 2022 पासून कलर्स टीव्ही तसेच OTT प्लॅटफॉर्म Voot वर सुरू झाली होती. तब्बल
26 पेक्षा जास्त भागांचा हा सीझन 2008 मध्ये सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सीझन बनला आहे. बॉलीवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टी हा शो 8 व्या सीझनपासून होस्ट करत आहे. त्याआधी त्याने 5वा आणि 6वा सीझनही होस्ट केला होता तर अभिनेता अर्जुन कपूरने शोचा 7वा सीझन होस्ट केला होता.
कोरिओग्राफर तुषार कालियाने फैसल शेख आणि मोहित मलिक यांना हरवून रोहित शेट्टी-होस्ट केलेला शो जिंकला
• शो 14 स्पर्धकांसह सुरू झाला होता ते स्पर्धक पुढीलप्रमाणे -
फैसल शेख, जन्नत जुबेर रहमानी, कनिका मान, मोहित मलिक, रुबिना दिलैक, तुषार कालिया, राजीव अदातिया, निशांत भट, प्रतीक सहजपाल, सृती झा, चेतना पांडे, शिवांगी जोशी, अनेरी वजानी
या सीझन मध्ये महिला स्पर्धकांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने पुरुष स्पर्धकांना तगडी स्पर्धा दिली. फैसल, जन्नत, रुबिना, कनिका, मोहित आणि तुषार हे ग्रँड फिनाले राऊंड पर्यंत पोहोचलेले स्पर्धक होते. शोमधील फिनालेचे तिकीट जिंकणारा तुषार कालिया हा पहिला स्पर्धक होता.
खतरों के खिलाडी 12 चा ग्रँड फिनाले 25 सप्टेंबर, 2022 रोजी प्रसारित झाला आणि डान्सर-कोरियोग्राफर तुषार कालिया, जो खडतर स्पर्धकांपैकी एक होता, खतरों के खिलाडी सीझन 12 चा विजेता घोषित करण्यात आला.
• खतरों के खिलाडी सीझन १२ रनर-अप -
खतरों के खिलाडी टॉप 5 स्पर्धकांमध्ये तुषार, रुबिना, जन्नत, फैसल आणि मोहित मलिक हे होते. त्यापैकी रुबिना आणि जन्नत बाहेर पडल्या आणि तुषार, मोहित आणि फैसल यांच्यामधे फिनाले चे अंतिम कार्य पार पाडले. त्यांपैकी तिघांनी टास्क वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आणि तुषार कलियाने मोहित आणि फैजलला मागे टाकत ट्रॉफी वर आपले नाव कोरले.
• खतरों के खिलाडी सीझन 12 विजेत्याला रोख-बक्षीस किती मिळाले?
विजेत्या आकर्षक ट्रॉफीसह, तुषार कालियाने स्विफ्ट कार देखील जिंकली कारण मारुती सुझुकी या शोचे अधिकृत प्रायोजक होते. तसेच तब्बल 20 लाख रुपयाची रक्कम त्याने जिंकली.
• खतरों के खिलाडी 12 ग्रँड फिनालेला कोण कोण उपस्थित होते?
खतरों के खिलाडी सीझन 12 च्या ग्रँड फिनालेला होस्ट रोहित शेट्टीच्या आगामी कॉमेडी चित्रपट सर्कसच्या स्टार कास्टने भाग घेतला, ज्यात पॉवरपॅक स्टार्स रणवीर सिंग, पूजा हेगडे, वरुण शर्मा, जॉनी लीव्हर, संजय मिश्रा आणि सिद्धार्थ जाधव इत्यादींचा समावेश होता. फिनाले मध्ये मनोरंजन आणि मजा यांचा परीपूर्ण डोस होता.
0 टिप्पण्या