महेश मांजरेकर यांनी होस्ट केलेल्या बिग बॉस मराठी 4 चा बहुप्रतिक्षित ग्रँड फिनाले मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बिग बॉस मराठीचा चाहतावर्ग विजेता जाणून घेण्यासाठी बऱ्याच दिवसांपासुन आतुरतेने वाट पाहत होता. बिग बॉस मराठी 4 या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अमृता धोंगडे आणि राखी सावंत यांनी ट्रॉफीसाठी शेवटपर्यंत झुंज दिली. महेश मांजरेकर यांनी होस्ट केलेल्या मराठी रिअॅलिटी टीव्ही शोचा चौथा सीझन 2 ऑक्टोबर 2022 रोजी 16 स्पर्धक आणि तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांसह लॉन्च करण्यात आला होता. शोचे टॉप 5 फायनलिस्ट अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, किरण माने, राखी सावंत आणि अमृता धोंगडे आज रात्री ग्रँड फिनालेमध्ये नृत्य आणि कलाप्रदर्शन सादर करताना आपल्याला पाहायला मिळाले.
ग्रँड फिनालेमध्ये लोकप्रिय मराठी कलाकारांचे काही खास नृत्य प्रदर्शन आणि माजी स्पर्धकांचे आकर्षक परफॉर्मन्स दाखवले गेले. आणि टॉप 5 स्पर्धकांच्या उत्कृष्ट परफॉर्मन्सने देखील प्रेक्षक भारावून गेले.
![]() |
Bigg Boss Marathi Season 4 Winner |
मराठी व हिंदी टेलिव्हिजन अभिनेता अक्षय केळकर हा मराठी बिग बॉस सीझन 4 चा विजेता म्हणून घोषित करण्यात आला.
अक्षयने 3 महिन्यांपूर्वी सीझनमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक म्हणून घरात प्रवेश केला होता. घरातील त्याच्या वादग्रस्त मारामारी आणि वक्तव्यांमुळे तो अनेकदा चर्चेत राहिला. या शोमध्ये तो 'अँग्री यंग मॅन' म्हणूनही ओळखला जात होता.
अक्षय हा होस्ट महेश मांजरेकर यांच्या घरातील सर्वात जास्त स्लॅम झालेल्या स्पर्धकांपैकी एक बनला. मुख्यतः त्याला शारीरिक मारामारीसाठी महेश यांनी बरेच समजावले होते. शोमध्ये 'अक्षयकडे खुप Superiority Complex आहे' असेही महेशने सांगितले होते. कधी-कधी महेशनेही घरातील 'प्रामाणिक' खेळाडू म्हणून त्याचे कौतुक केले होते.
अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर या शोचे टॉप 2 फायनलिस्ट ठरले. अपूर्वा नेमळेकर ही पहिली रनर अप ठरली आणि किरण माने हे दुसरे रनर अप राहिले. अमृता धोंगडे ही चौथी स्पर्धक होती जी घराबाहेर पडली आणि राखी सावंत 9 लाख रुपयांची ब्रीफकेस घेऊन बिग बॉस च्या घराचा निरोप घेतला.
• अक्षय केळकरला मिळालेली बक्षिसे पुढीलप्रमाणे -
त्याला शोची प्राइज रु. 15,55,000 आणि चमकदार ट्रॉफी तसेच प्रायोजकांकडून सोन्याचे ब्रेसलेट, घरातील 'बेस्ट कॅप्टन' म्हणून प्रायोजकांकडून 5 लाख रुपये एवढे बक्षिस अक्षयला मिळाले.
> बिग बॉस मराठी सीझन 4 विनर (Bigg Boss Marathi Season 4
Winner) -
अक्षय केळकर
> बिग बॉस मराठी सीझन 4 फर्स्ट रनर अप (First Runner-up) -
अमृता नेमळेकर
> बिग बॉस मराठी सीझन 4 सेकंड रनर अप (Second Runner-up) -
किरण माने
Tags :
bigg boss marathi season 4 finalist
marathi bigg boss season 4 winner
marathi bigg boss season 4 finale
biggboss marathi season 4
winner of biggboss marathi season 4
biggboss marathi season 4 grand finale
Akshay kelkar biggboss 4 winner
0 टिप्पण्या