धनंजय मनोहर खंडागळे यांचा आगामी 'सर्जा' या संगीतमय चित्रपटाच्या टायटल पोस्टरने सोशल मीडियावर नुकताच धुमाकूळ घातला आहे. नुकतेच, निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यासाठी चित्रपटाचे पहिले नवीन पोस्टर रिलीज केले.
![]() |
Sarja marathi movie 2023 |
दिग्दर्शक - धनंजय मनोहर खंडाळे
कलाकार - ऐश्वर्या भालेराव, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, अनिल नगरकर, ज्योती शेतसांडी
प्रोड्यूसर - रमेश रंगराव लाड, अमित जयपाल पाटील
संगीत - हर्षित अभिराज
सिनेमॅटोग्राफी - राहुल मोतलिंग
एडिटर - सुबोध नारकर
प्रोडक्शन कंपनी - राजवर्धन फिल्म्स क्रिएशन
गायक - अभय जोधपूरकर, वैशाली म्हाडे, आदर्श शिंदे
रिलिज डेट - 14 एप्रिल 2023
देश - भारत
भाषा - इंग्रजी, मराठी
• सर्जा (2023) चित्रपटाची कथा (Story of Sarja Marathi Movie 2023) -
एका गावात सर्जा, गौरी आणि धनराज हे तीन मित्र आहेत. जे इयत्ता पहिली ते कॉलेज पर्यंत एकत्र आहेत. ते त्यांच्या लहानपणापासून चांगले मित्र आहेत, परंतु त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीनुसार त्यांच्यावर परिस्थितीचाही परिणाम होतो. ते तिघेही एकमेकांशी खूप छान असतात तोपर्यंत, त्याच कॉलेजमध्ये, वैशाली, एक आधुनिक आणि दिखाऊ शहरी मुलगी प्रवेश घेते आणि प्रेमाचा एक नवीन अध्याय सुरू होतो. सर्जा ही एक प्रेमकथा आहे जी नक्कीच आपल्याला प्रेम करायला शिकवेल.
सर्जा चित्रपटाची कथा ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या गावात घडते. 'सर्जा' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत कोणताही मोठा मराठी स्टार नसला तरी रसिकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यात नवीन कलाकार यशस्वी झालेला दिसत आहे.
चित्रपटाचे निर्माते धनंजय खंडागळे म्हणाले, हा एक सामान्य जीवनातील खरा वाटावा असा एक चित्रपट आहे. यातील प्रत्येक कॅरेक्टर पाहणाऱ्या प्रत्येकाशी कुठं ना कुठं रिलेट करेल. यात लव्हस्टोरीसोबत इतरही विविध गोष्टी पाहायला मिळणार आहेत. "एक संगीतमय प्रेमकथा 'सर्जा'च्या रूपात मराठी प्रेक्षकांसमोर मांडण्याचे स्वप्न हर्षित-अभिराज यांच्या प्रयोगशील आणि मधुर संगीतामुळे शक्य झाले आहे. आमच्या संपूर्ण टीमने एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपट 'सर्जा'च्या रूपात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये अनिल नगरकर, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, ऐश्वर्या भालेराव, आकाश पेटकर, ज्योती शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडागळे आणि कुणाल गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सर्जा मराठी चित्रपट 14 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
👉👉 Watch Online 👈👈
• सर्जा चित्रपटातील गाण्यांची यादी (Sarja Marathi Movie 2023 Song Lists) -
1) "जीव तुझा झाला " गायक - वैशाली म्हाडे, हर्षित अभिराज, अजय जोधपुरकर वेळ - 4:10 मिनिटे.
2. "धड धड" गायक - आदर्श शिंदे वेळ - 3:55 मिनिटे.
Tags:
Sarja marathi movie 2023
Sarja marathi movie watch online
Sarja marathi movie 2023 release date
Sarja marathi movie
Sarja marathi movie cast
Sarja marathi movie actress name
Sarja movie 2023
Sarja marathi movie songs
Sarja 2023
सर्जा मराठी चित्रपट २०२३
0 टिप्पण्या