जेजुरीला पाणी पुरवणाऱ्या नाझरे धरणात फक्त दीड महिना पुरेल एवढंच पाणी शिल्लक

Jejuri News: नाझरे धरणात फक्त दीड महिना पुरेल इतकाच पाणी शिल्लक आहे.

जेजुरी व आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या कऱ्हा नदीवरील नाझरे धरणात फक्त दीड महिना पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी कमी पावसाअभावी अजुन धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही, त्यामुळे या परिसरात चिंतेचे वातावरण आहे. या धरणाची पाणीसाठाक्षमता 788 दशलक्ष घनफूट असून यातील 588 दशलक्ष घनफूट साठा उपयुक्त आहे. तर 200 दशलक्ष घनफूट पाणीसाठा मृत मानला जातो. या धरणाचे एकूण पाणलोट क्षेत्र 397.82 चौरस किलोमीटर आहे,सध्या या धरणामध्ये मृत साठ्यापैकी फक्त 156 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे, त्यामध्येही गाळ भरपूर आहे.


Nazare Dam
नाझरे धरण 


सासवड, सोमर्डी,कोडीत, गराडे, चांबळी, भिवडी, घेरा पुरंदर, नारायणपूर या भागात चांगला पाऊस झाल्यावरच पाणी कऱ्हा नदीतून नाझरे धरणात येत असते , परंतु पुरंदर तालुक्यातच पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने या धरणात अजून पाणी आलेले नाही. त्यामुळे धरणाचे पात्र कोरडे पडत चालले आहे. गराडे धरण 50 टक्के आहे. ते पूर्ण भरल्यानंतर वाटेतील सर्व बंधारे भरून पाणी नाझरे धरणात येत असते.

नाझरे धरणातून जेजुरी गाव,जेजुरी औद्योगिक वसाहत,इंडियन सिमलेस कंपनी, मोरगाव व 16 गावे, नाझरे व पाच गावे इ. शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो,सुमारे 3150 हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली आहे. नाझरे धरणात अजूनही पाणीसाठा वाढला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे. धरणाच्या परिसरात एक जून पासून 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे,गेल्या वर्षी हाच पाऊस 996 मिलिमीटर होता. जेजुरी हे तीर्थक्षेत्र आहे येथे येणाऱ्या भाविकांना याच धरणातील पाणी पुरविले जाते.पुरंदर तालुक्यात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने बऱ्याचशा पेरण्या रखडल्या होत्या परंतु गेले चार-पाच दिवस रिमझिम पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या होण्याची शक्यता आहे.

पाणीसाठा आटल्याने विविध योजनांना दिवसाआड पाणीपुरवठा

नाझरे धरणात सध्या गाळमिश्रित पाणी शिल्लक राहिल्याने संभाव्य पाणी टंचाईचे संकट लक्षात घेऊन सर्व पाणीपुरवठा योजनांना सध्या दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. पाणीसाठा न वाढल्यास पंधरा दिवसांनंतर फक्त पिण्यासाठीच काही तास पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती नाझरे सिंचन विभागाचे अधिकारी विश्वास पवार व शाखा अभियंता अनिल घोडके यांनी दिली.

पाण्याचा साठा संपुष्टात आल्याने विविध प्रकल्पांना दररोज पाणीपुरवठा होतो

नाझरे धरणातील उरलेल्या गाळामुळे पाणीटंचाईचे संकट उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन सर्व पाणीपुरवठा योजनांना सध्या दिवसा पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात धरणाची पाणी साठवण क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. पंधरा दिवसांनंतर पाणीपुरवठ्यात वाढ न झाल्यास काही तास पिण्यासाठीच पाणीपुरवठा होणार असल्याचे नाझरे पाटबंधारे विभागाचे अधिकारी विश्वास पवार व शाखा अभियंता अनिल घोडके यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या