Pahije Jatiche (2023) Marathi Movie Cast, Review | पाहीजे जातीचे मराठी चित्रपट

 Pahije Jatiche (2023) Marathi Movie :

पाहीजे जातीचे हा आगामी मराठी चित्रपट आहे जो 4 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन के.नरेंद्र बाबू यांनी केले आहे आणि त्यात संजना काळे, सयाजी शिंदे, शुशांत कोळी आणि विक्रम गाजरे हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

वाचायला शिका, विचार करायला शिका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न विचारायला शिका अशी शिकवण बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिली आहे. ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांनी याच शिकवणीचा धागा पकडून ‘पाहिजे जातीचे’ हे महाकाव्य नाटक तयार केले आहे. या नाटकावर आधारित ‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट 4 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. शनिवारी (15 जुलै) ला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता.


Pahije Jatiche (2023) Marathi Movie | पाहीजे जातीचे मराठी चित्रपट
Pahije Jatiche (2023) Marathi Movie


चित्रपटाचे नाव (Movie Name) - पाहीजे जातीचे (Pahije Jatiche)
प्रकाशन तारीख (Release Date) - 4 ऑगस्ट 2023
कलाकार (Cast) - विक्रम गाजरे, संजना काळे, सयाजी शिंदे, भागीरथीबाई कदम, अमीर ताडवलकर, सुशांत कोळी, नागनाथ साळवे, दिलीप अहिरे, पुष्पा राठोड.
दिग्दर्शक (Directer) - कबड्डी नरेंद्र बाबू
आर्ट डायरेक्टर - एम डी पुरुषोत्तम
असोसिएट डायरेक्टर - संदिप वसावे
निर्माते (Producer) - डॉ. मल्लिकार्जुन एन. गाजरे
Executive Producer - गुरुदत्त गाजरे, पंकज वाटकर
पटकथा - उमा व्ही. कुलकर्णी, कबड्डी नरेंद्र बाबू
कथा - विजय तेंडुलकर
संवाद - विजय तेंडुलकर, उमा व्ही. कुलकर्णी
संगीत - अन्वेशा
गायक - अन्वेशा, अभय जोधपूरकर, हृषिकेश रानडे.
कोरिओग्राफर - राम किरण टी
ऑडिओग्राफर - तापस नायक
सिनेमॅटोग्राफी (DOP) - एमबी अल्लिकट्टी
एडिटर - हरीश कोमे
प्रोडक्शन हाऊस - गाजरे फिल्म्स
भाषा - मराठी


• पाहीजे जातीचे मराठी चित्रपटाचा ट्रेलर (Pahije Jatiche Marathi Movie 2023 Trailer)

                                       👇👇👇
                                        येथे पहा


कबड्डीचे दिग्दर्शक नरेंद्र बाबू आणि डॉ. मल्लिकार्जुन एन. गाजरे निर्मित "पाहिजे जातीचे" हा चित्रपट सामाजिक-सांस्कृतिक मुद्द्यांवर भाष्य करणारा आणि प्रश्न विचारणारा चित्रपट असल्याचे ट्रेलरवरून दिसून येत आहे.

विक्रम गाजरे, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, संजना काळे, सयाजी शिंदे पुन्हा एकदा आपला धडाकेबाज अभिनय सादर करण्यासाठी सज्ज झाले आहे. या चित्रपटात महिपती या एका छोट्या गावातील एका महत्त्वाकांक्षी तरुणाची कथा सांगितली आहे, जो केवळ आपल्या जातीमुळे रोखण्याचा प्रयत्न करतो, पण तो कसा यशस्वी होतो.

अभिनेते सयाजी शिंदे, विक्रम गाजरे, संजना काळे, दिलीप अहिरे, निर्माते डॉ. मल्लिकार्जुन एन. गाजरे, लेखक-दिग्दर्शक डॉ. नरेंद्र बाबू, संवाद लेखक उमा कुलकर्णी आणि संगीत दिग्दर्शक अन्वेशा यांनी या चित्रपटासाठी मेहनत घेतली आहे.

आजही लहान मुलांचे जीवन जातीच्या लेबलांनी खिळखिळे केले जाते. त्यामुळे जातीव्यवस्थेत न अडकता केवळ बुद्धिमत्ता आणि गुणवत्तेवर अवलंबून राहून प्रगती करायला शिकवणारा हा सिनेमा येतोय.


• FAQs:

प्रश्न - 'पाहीजे जातीचे' ची रिलीज डेट काय आहे?
उत्तर
-'पाहीजे जातीचे' ची रिलीज डेट 4 ऑगस्ट 2023 आहे.


प्रश्न - 'पाहीजे जातीचे' मधील कलाकार कोण आहेत?
उत्तर
- 'पाहीजे जातीचे' या चित्रपटात विक्रम गाजरे, संजना काळे, सयाजी शिंदे, भागीरथीबाई कदम, अमीर ताडवलकर, सुशांत कोळी, नागनाथ साळवे, दिलीप अहिरे, पुष्पा राठोड हे कलाकार आहेत.


प्रश्न - 'पाहीजे जातीचे' चे दिग्दर्शक कोण आहेत?
उत्तर
- 'पाहीजे जातीचे' चे दिग्दर्शन के. नरेंद्र बाबू यांनी केले आहे.


प्रश्न - 'पाहीजे जातीचे' हा चित्रपट कोणत्या प्रकारचा आहे?
उत्तर
- 'पाहीजे जातीचे' हा चित्रपट ड्रामा प्रकारातील आहे.


प्रश्न - 'पाहीजे जातीचे' कोणत्या भाषेत प्रदर्शित होत आहे?
उत्तर
- 'पाहिजे जातीचे' मराठी भाषेमध्ये प्रदर्शित होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या