पुरंदर व दौंड तालुक्यातील पोलिस पाटील भरतीला स्थगिती

 Purandar News : 

पुरंदर उपविभागातील पुरंदर व दौंड तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी 1 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पावसाची स्थिती लक्षात घेऊन तसेच अन्य प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली असल्याचे नुकतेच उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी कळवले आहे. 


Purandar daund police patil bharti
Purandar daund police patil recruitment 


       जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार 3 जुलै 2023 रोजी पोलीस पाटील भरती प्रकिये बाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पोलीस पाटील पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी 24 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया ठरलेल्या वेळेनुसार मंगळवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता परीक्षा घेण्यात येणार होती. काही नैसर्गिक आणि प्रशासकीय कारणास्तव ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

         पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी/मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. पुरंदर तालुक्यातील गराडे, सोनोरी व हिवरे या गावांतील पुणे रिंग रोडसाठी संपादित जमिनीच्या मोजणीची तारीख निश्चित केलेली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नियोजित लेखी परीक्षा घेणे प्रशासकीय कारणास्तव शक्य होणार नसल्याने 1 ऑगस्ट रोजीची नियोजित लेखी परीक्षा पुढील तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. दौंड-पुरंदर उपविभागीय कार्यालयाकडून लेखी परीक्षेचा दिनांक, स्थळ व पुढील कालबद्ध कार्यक्रमाबाबत अवगत करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या