सासवड येथे सराईत दुचाकी चोरट्यास अटक : तब्बल 5 मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात, सासवड पोलिसांची कामगिरी

Saswad News : तब्बल 5 मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे दि. 30 जुलै 2023 रोजी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पाच मोटरसायकल चोरल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्या माहितीवरून पोलिसांनी त्या पाचही मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत.

Saswad news

   

पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहिती नुसार  रविवारी   पोलीस हवालदार गणेश पोटे, संतोश शिंदे, योगेश गरूड, वाहतुक अधिकारी ऋतुराज देसाई, विक्रम जगताप हे सासवड शहरात जेजुरी नाका येथे वाहतुक नियमन व कारवाई करत असतांना दुपारी 3 वाजल्याच्या सुमारास एक तरुण संशयास्पद स्थितीत मोटार सायकल घेवुन जातांना आढळून आला. त्याच्याकडे गाडीचे कागदपत्र वाहन चालवण्याचा परवाना मागितला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली व तो त्याच्याकडे असलेली मोटासायकल होंडा शाईन तशीच सोडुन नारायणपुर बाजुकडे पळुन गेला. त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडुन ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेवुन चौकशी करून होंडा शाईन मोटार सायकल  बाबत विचारपुस केली असता त्याने  मोटार सायकल  बारामती  मधील रूई एम.आय.डी.सी परीसरातुन चोरलेली असल्याची कबुली दिली आहे. तसेच तो चाकण येथुन बारामती येथे घरी महिन्या दोन महिन्यातुन जात येत होता. पण गावी जाण्या येण्यासाठी गाडी पाहिजे होती. घरचे लोक गाडी घेवुन देत नव्हते. म्हणुन तो गाडया चोरून काही दिवस वापरून सोडुन देत असे. 

त्याने सासवड परीसरातुनही चार मोटार सायकल चोरल्या असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्या सर्व मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहेत. 

सराईत गुन्हेगाराचे नाव अल्ताफ ईकरार सय्यद असे आहे, वय 20 वर्ष आहे. तो सध्या निवृत्ती कार डेकोर वॉशिंग सेंटर जवळ, रूई एम.आय.डी.सी, बारामती, ता. बारामती, जि. पुणे. येथे राहतो. तो मुळचा उत्तर प्रदेशचा असल्याचं त्यानं सांगितलय.


• पोलिसांनी ताब्यात  घेतलेल्या मोटार सायकल - 

१) होंडा शाईन मोटार सायकल नं.

MH.42.AB.0327 

२) होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल 

नं.MH.12.JY.5568 

३) होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.12.GW.2488 

४) होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.12.QU.8092 

५) होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. 

MH.50.F.3931


 ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोश जाधव, पोलीस अंमलदार संतोश शिंदे, गणेश पोटे, योगेश गरूड, जब्बार स्ययद, विशाल नगरे, शरद जाधवर, होमगार्ड विक्रम जगताप, ट्राफिक वार्डन श्रीकांत भंडलकर, चक्रधर गोपाळघरे, ऋतुराज देसाई, सचिन पवार, अक्षय लोंढे यांच्या पथकाने केलेली आहे.                      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या