यवतमाळ अपघात :
आर्णी ते धानोडा राष्ट्रीय चौपदरी महामार्गावरील कोसदनी घाटात विचित्र अपघात घडून त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी संजय नेटके व आयशर वाहनाचा चालक पांडुरंग हरी नकाते जागीच ठार झाले. तर दोन पोलिस कर्मचारी कुणाल साळवे, संतोष हराळ गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना काल 30 जुलै 2023 रोजी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास घडली.
![]() |
Yavatmal Accident |
जखमींना यवतमाळ येथे रुग्णालयात हलवले आहे. कोसदनी हायवे पोलिस कोसदनी घाटात ट्रकचे पेपर तपास करत होते मागून येणाऱ्या आयशर गाडीने पोलिस गाडीला जोरदार टक्कर दिली त्यामुळं पोलिस गाडी समोर असलेला ट्रक आणि मागून आलेल्या आयशर मध्ये पोलिस वाहनाचा अक्षरशः चुराडा होऊन पोलिस गाडीमध्ये बसलेले एक कर्मचारी व आयशर वाहनाचा चालक जागीच ठार झाले.
आर्णी रोडवर पेपर तपास करणारे दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना यवतमाळ येथे रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले
महामार्ग पोलिस यंत्रणेने पोलिस अधीक्षक यशवंत सोळंकी यांना मध्यरात्री ही बातमी कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले.
0 टिप्पण्या